Translate this blog

banner

Wednesday, February 9, 2011

पेठ(कोथळी गड) कर्जत.

रविवार, ६ फेब्रूवारी २०११

काल आम्ही कर्जत तालुक्यातील पेठ (कोथळीगड) येथे जायचे ठरवले आणि तसे प्लान्निग केले. मी कल्याण वरून सकाळची ५.३० ची कर्जत ट्रेन पकडून कर्जतला गेलो. रवी आणी विजय तिथेच भेटले. कर्जत (पश्चिम) गावातून  सकाळी ८.३० ची आंबिवली बस आहे. ती जर चुकली तर ३ टम टम बदलून आंबिवली ला जावे लागते. आणि आमचे तेच झाले. बस चुकली. शेवटी टम-टम (6 seater) पकडून आम्ही तिघे कडाव पर्यंत गेलो, तिथून लगेच दुसरी टम टम पकडून कशेळे ला गेलो आणि पुढे अम्बिवालीला गेलो.
धामणी (अम्बिवलीला) उतरून आम्ही गडाच्या दिशेने निघालो. चढताना उशीर झाल्यामुळे उनातून जावे लागले.

पेठ गावात जाण्यासाठी आंबिवली गावातून कच्चा रस्ता बांधला आहे,त्याच रस्त्याने जावे.
 नुकताच आंब्याला मोहोर आला होता. तिथे फोटो काढून आम्ही पुढे निघालो.
बरेच अंतर पार केल्यावर दुरून दर्शन झाले ते कोथळी गडाचे.

पेठ (कोथळी गड)
कोथळी गड (उंची १५५० फुट)
इतिहास:
सन १६५६-५७ च्या सुमारास शिव छत्रपतींनी ढाक दुर्ग व राजमाची सोबत कोथळी गड स्वराज्यात दाखील करून घेतला. पुढे नोव्हेंबर १६८४ पर्यंत कोथळी गड स्वराज्यात होता. शिव काळात कोथळी गडाचा संरक्षक ठाणं व शस्त्रागार म्हणून उपयोग होत असे. छत्रपती संभाजी राजांच्या कारकीर्दीत माणकोजी पांढर्यांनी अब्दुल कादरला व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक म्हणून दुर्गात प्रवेश करवून दिला अन त्यांनी गडावरच सैन्य कापून काढलं.
करवंदीची फुले.

  वर चढताना आम्हाला करवंदाची फुले लागली. कच्ची बोर खात आम्ही वरती चढत गेलो.











हर हर महादेव कि अली मदद???


वर चढताना मध्ये आमच्या दोन वीरांत मराठे संचारले कि मुघल संचारले त्यांनाच माहित, पण मला त्यांचा फोटो काढण्याची इच्छा झाली.











भर उनात वर चढताना डोंगरावरील निसर्ग सौंदर्य पाहून आलेला थकवा कमी झाला.




सह्याद्री

हळू हळू आम्ही पठारावर पोहोचलो आणि दुरून 
दर्शन झाले ते  सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे. 
छत्रपती शिवरायांच्या  मराठा सरदारा प्रमाणे रांगड्या देहाचा निडर कोथळी गड  दिसत होता.


रणरणत्या उनातून आम्ही पायथ्याशी आलो. गावात तोफेचा पंचधातूंनी बनवलेला मागचा भाग आम्हास पहावयास मिळाला.




गावात थोडा आराम करून, नंतर फोटो शेशन करत आम्ही गडाच्या दिशेने चढू  लागलो.







जसे नववधू लग्नात नटावी तसेच माघ महीन्यातील  आंब्याला नवीन पालवी फुटली होती.









आणि आम्ही गडाच्या दिशेने वाटचाल सुरु केली.










मजल दरमजल करत आम्ही किल्ल्यावर पोहोचलो.








 

   


 किल्ल्याचा इतिहास (नक्की वाचा)




 

किल्ल्याच्या पायथ्याशी ८० रुपयात (वेज) आणि नोन वेज १०० रुपये (नोनवेज साठी आधी सांगावे लागते) येथे पोटभर जेवण मिळते.




परतताना आंबिवली गावातून संध्याकाळी ५.३० वाजता कर्जतला  बस सुटते.


धन्यवाद,

निशांत पोतदार (कल्याण)
विजय वाघ (खोपोली)
आणि रविंद्र पाटील. (पुणे)

Powered byEMF Online Form
Report Abuse