Translate this blog

banner

Wednesday, May 16, 2018

इतक्यात आलेला एक अनुभव


१६ मे २०१८

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

आज नुकताच आलेला अनुभव शेअर करत आहे.

Image result for tyre pressure checking near highway india
Image courtesy: गुगल्या भाऊ 















आपल्यापैकी बरेच जण दररोज घर ते ऑफिस दुचाकी किंवा चार चाकीवरून प्रवास करत असतात आणि

सध्या उन्हाळा असल्यामुळे बरेच दा टायरचे प्रेशर कमी होते आणि हिवाळ्यात वाढते. कधी कधी आपण रस्त्याजवळ हायवेला लागून असलेल्या छोट्या ग्यरेज मध्ये हवा भरून घेण्यासाठी थांबतो आणि त्याच वेळेस आपल्याला सांगितले जाते कि टायर पंक्चर आहे.

मी दररोज गेली ४ वर्ष बुलेटने ऑफिसला जातो आणि नेहेमीच हायवे वर हवा भरून घेतो. काही दिवसांपूर्वी  मी नेहेमीप्रमाणे हायवे वर हवा भरून घेतली आणि अचानक मेकॅनिक ने सांगितले पुढच्या टायर मध्ये हवा कमी आहे, खूपच उन होत आणि मला ऑफिसला जायला उशीर होत होता, त्यात त्याच्यात थोडा कॉन्फिडन्स कमी वाटला म्हणून त्याला नाकारून मी पुढे निघालो. ऑफिस सुटल्यावर पुन्हा टायर दाबून पहिला असता हवा जरासुद्धा कमी नव्हती, त्यानंतर मी जव्हारची सोलो राईड पण मारली.

पुन्हा गेल्या सोमवारी हवा भरायला हायवेला दुसऱ्या गरेज मध्ये थांबलो असता त्याने सुद्धा मला हेच सांगितले कि पुढच्या टायर मध्ये हवा भरून काही फायदा नाही, टायर पंक्चर आहे. बाकी यावेळेस मला थोडे खरे वाटले कारण राईड मारून आल्यामुळे कदाचित कुठेतरी गाडी पंक्चर झाली असावी.
माकॅनिक ने मला टायर दाबून दाखवून पटवून देण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि मी तयार झालो. यावेळेस सुद्धा टायर बदलायला वेळ लागेल म्हणून मी निघालो.
गाडीचे RSA (Road Side Assistance) असल्याने ऑफिस ला येऊन माकॅनिक ला बोलावून घेतले. त्याने चेक करून सांगितले कि टायर बिलकुल  पंक्चर नाही आहे.

मंडळी , सांगायचा हेतू हाच कि ज्यावेळेस तुम्ही हवा भरायला कुठे थांबता तर लगेच कुणावर विश्वास ठेऊ नका. सध्या प्रत्येक जण कमी मेहनत घेऊन श्रीमंत व्हयला बघतोय जे साफ चुकीचे आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा अश्या ट्रापमध्ये सापडू नये हीच इच्छा.

धन्यवाद,

निशांत पोतदार

ब्लॉगपोस्ट कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग शेअर करा.
आपले फेसबुक पेजलाईक करायला विसरू नका:  https://www.facebook.com/paaulwata
YouTube वर पण Subscribe करा: https://www.youtube.com/channel/UC3GalhgUi_5i_bWBFj7odzA

Saturday, January 20, 2018

महाकाय श्री हनुमान - नांदुरा, महाराष्ट्र




माझ्या प्रिय सभासदांनो पुन्हा एकदा नमस्कार!




काही कारणांमुळे ब्लॉग लिहायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.
मागच्या महिन्यात काही कामासाठी खामगावला गेलो होतो, तेव्हाच ठरवले कि नंदुर्याला जायचे.

नांदुरा हे गाव इतके प्रचलित नाहीये पण हेच गाव एका खास गोष्टीसाठी फार प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथला मारुती. आता तुम्ही म्हणाल त्यात काय इतके? आमच्या गावात / शहरात नाही का मारुती? नक्कीच आहे पण मंडळी, इतका मोठ्ठा नक्कीच नाही जितका इथे आहे.

होय मित्रांनो! इथे जी हनुमानाची मूर्ती आहे ती तब्बल १०८ फुट उंच आहे जी विश्वातली सर्वात उंच मुर्ती आहे आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद केली गेली आहे.. अनेक वर्ष मला इथे भेट देण्याचा योग येत नव्हता तो अखेर आला...




शेवटी ठरले, मग मी आणि माझा मेहुणा गौरव आम्ही त्याच्या गाडीवर निघालो.
खामगाव पासून जवळ जवळ अर्धा तासावर नांदुरा आहे आणि शेगाववरून सुद्धा तितकेच अंतर असावे.

जसे आम्ही नंदुर्याला येत होतो तसतशी हनुमानाची मुर्ती मोठी होत जाताना दिसली जसे समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचे वर्णन केले आहे.. "वाढता वाढता जाये ; भेदिले सुर्यमंडळा!" आणि "भीमरूपी महारुद्रा!"

मारुतीची प्रशस्त मुर्ती डोळ्यात मावत नव्हती. खरोखरच स्वामींनी वर्णन केल्याप्रमाणेच तो भीमरूपी महारुद्र होता.. जवळ जाताच आपण किती ठेंगणे आहोत याचा प्रत्यय येतो.





महाकाय मारुतीची माहिती:

महावीर मारुतीची अनेक मंदिरे भारतात आहेत पण इथे विश्वातली सर्वात उंच मुर्ती विराजमान आहे.

 श्रद्धा का प्रतिरूप है जो,
संकल्प जहां न अधुरा है|
बसते है विराट हनुमान जहां,
वह भाग्यशाली ग्राम नांदुराहै||

देशाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा गाव आहे. गावाच्या पश्चिम दिशेला भारतातली सगळ्यात उंच १०८ फुट उंच महाकाय  मारुतीची मुर्ती आहे.मूर्तीच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम २१ ऑक्टोबर १९९९ नंतर करण्यात आला. १७ फुट पाया  खोदून त्यावर ४२ X ४६ फुट आणि ८ फुट उंच चबुतरा बनवून त्यावर मूर्तीचे निर्माण कार्य सुरु केले गेले. पाया पासून ते मूर्तीच्या डोक्यापर्यंत उंची १०८ फुट आहे.


मूर्तीच्या निर्माण कार्यात ३७५ ट्रक सिमेंट, ४०० क्विंटल लोखंड वापरले गेले आहे. मुर्ती मजबुत बनवण्यासाठी २५ mm च्या ८० सळया दोन्ही पायांतून पुर्ण शरीरात टाकल्या आहेत.मुर्ती प्रत्येक तासाला PH 350 KM वेगाचे वादळ आणि ४-५ रीस्टेल स्केल चा भूकंप सहन करू शकते हे मूर्तीचे खास वैशिष्ट आहे.
जवळ जवळ दीडवर्षाच्या  कालावधीनंतर मुर्ती पुर्ण तयार झाली.

मूर्तीची छाती -७० फुट 
पायाचा तळवा -३२ फुट
गदेची लांबी -३४ फुट
मुकुटाची लांबी -१५ फुट 


मारुतीचे दर्शन घेतले आणि अगदी जवळ जाऊन मुर्ती पहिली. लवकरच मूर्तीचा जीर्णोद्धार होणार आहे असे समझले. मूर्तीच रंगकाम आणि डागडुजी सुरु होणार असुन, मला मिळालेल्यामाहिती प्रमाणे येत्या सहा महिन्यांत पुर्ण होऊ शकते, तेव्हा जून २०१८ नंतर नक्की इथे भेट द्या.

दर्शन झाले, फोटो काढले आणि मागे एक सुंदर मंदिर दिसले, तेव्हा समझले कि ते तिरुपती बालाजीचे आहे. मंदिरात राधा कृष्णाच्या लीला करताना अनेक सुंदर मुर्त्याआहेत तसेच  गणपती, गरुड यांची सुद्धा मंदिरे आत आहेत.  सभा मंडप तर फारच छान आहे. मंदिराला आणि मूर्त्यांना रंग देणाऱ्या कलाकारांचे विशेष कौतुक!
त्यांनी मंदिरातल्या प्रत्येक मूर्तीत प्राण ओतून रंग रेखाटले आहेत आणि त्याची प्रचीती आपण स्वतः ज्यावेळेस मंदिराला भेट देऊ तेव्हाच कळेल.

मंदिरात, संस्थाना मार्फत अनेक सेवा देण्यात येतात जसे, बालाजी मंदिराखालीच गरिबांसाठी एक हॉस्पिटल आहे जिथे मोफत डोळ्यांच्या शत्रक्रिया करण्यात येतात.
मंदिराचे काम अजून चालू आहे , तरी जून २०१८ च्या नंतर भेट दिल्यास तुम्हाला फायदा होईल.

नांदुरा कसे जायचे?

मुम्बई वरून येणार असाल तर विधर्ब एक्स्प्रेस किंवा अमरावती ने नांदुरा ला उतरून जाऊ शकता किंवा शेगाव वरून सुद्धा बस , रिक्षा आहेत.

खाली दिलेल्या लिंक वर फोटो पहावयास मिळतील.

महाकाय श्री हनुमान, नांदुरा 



ब्लॉग कसा वाटला? नक्की सांगा आणि पाऊलवाटा YouTube Channel Subscribe नक्की करा.




मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम |
वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये....

|| जय श्री राम जय हनुमान ||


Thursday, January 18, 2018

लवकरच येतोय नांदुरा महावीर हनुमानाची माहिती घेऊन....



लवकरच येतोय नांदुरा महावीर हनुमानाची माहिती घेऊन.... 

तोवर आपल्या पाऊलवाटा YouTube channel ला subscribe नक्की करा.....

==> पाऊलवाटा YouTube