माझ्या प्रिय सभासदांनो पुन्हा एकदा नमस्कार!

मागच्या महिन्यात काही कामासाठी खामगावला गेलो होतो, तेव्हाच ठरवले कि नंदुर्याला जायचे.
नांदुरा हे गाव इतके प्रचलित नाहीये पण हेच गाव एका खास गोष्टीसाठी फार प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथला मारुती. आता तुम्ही म्हणाल त्यात काय इतके? आमच्या गावात / शहरात नाही का मारुती? नक्कीच आहे पण मंडळी, इतका मोठ्ठा नक्कीच नाही जितका इथे आहे.
होय मित्रांनो! इथे जी हनुमानाची मूर्ती आहे ती तब्बल १०८ फुट उंच आहे जी विश्वातली सर्वात उंच मुर्ती आहे आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद केली गेली आहे.. अनेक वर्ष मला इथे भेट देण्याचा योग येत नव्हता तो अखेर आला...

खामगाव पासून जवळ जवळ अर्धा तासावर नांदुरा आहे आणि शेगाववरून सुद्धा तितकेच अंतर असावे.
जसे आम्ही नंदुर्याला येत होतो तसतशी हनुमानाची मुर्ती मोठी होत जाताना दिसली जसे समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचे वर्णन केले आहे.. "वाढता वाढता जाये ; भेदिले सुर्यमंडळा!" आणि "भीमरूपी महारुद्रा!"
मारुतीची प्रशस्त मुर्ती डोळ्यात मावत नव्हती. खरोखरच स्वामींनी वर्णन केल्याप्रमाणेच तो भीमरूपी महारुद्र होता.. जवळ जाताच आपण किती ठेंगणे आहोत याचा प्रत्यय येतो.
महाकाय मारुतीची माहिती:
महावीर मारुतीची अनेक मंदिरे भारतात आहेत पण इथे विश्वातली सर्वात उंच मुर्ती विराजमान आहे.
श्रद्धा का प्रतिरूप है जो,
संकल्प जहां न अधुरा है|
बसते है विराट हनुमान जहां,
वह भाग्यशाली ग्राम नांदुराहै||
देशाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा गाव आहे. गावाच्या पश्चिम दिशेला भारतातली सगळ्यात उंच १०८ फुट उंच महाकाय मारुतीची मुर्ती आहे.मूर्तीच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम २१ ऑक्टोबर १९९९ नंतर करण्यात आला. १७ फुट पाया खोदून त्यावर ४२ X ४६ फुट आणि ८ फुट उंच चबुतरा बनवून त्यावर मूर्तीचे निर्माण कार्य सुरु केले गेले. पाया पासून ते मूर्तीच्या डोक्यापर्यंत उंची १०८ फुट आहे.
मूर्तीच्या निर्माण कार्यात ३७५ ट्रक सिमेंट, ४०० क्विंटल लोखंड वापरले गेले आहे. मुर्ती मजबुत बनवण्यासाठी २५ mm च्या ८० सळया दोन्ही पायांतून पुर्ण शरीरात टाकल्या आहेत.मुर्ती प्रत्येक तासाला PH 350 KM वेगाचे वादळ आणि ४-५ रीस्टेल स्केल चा भूकंप सहन करू शकते हे मूर्तीचे खास वैशिष्ट आहे.
जवळ जवळ दीडवर्षाच्या कालावधीनंतर मुर्ती पुर्ण तयार झाली.
मूर्तीची छाती -७० फुट
पायाचा तळवा -३२ फुट
गदेची लांबी -३४ फुट
मुकुटाची लांबी -१५ फुट

त्यांनी मंदिरातल्या प्रत्येक मूर्तीत प्राण ओतून रंग रेखाटले आहेत आणि त्याची प्रचीती आपण स्वतः ज्यावेळेस मंदिराला भेट देऊ तेव्हाच कळेल.
मंदिरात, संस्थाना मार्फत अनेक सेवा देण्यात येतात जसे, बालाजी मंदिराखालीच गरिबांसाठी एक हॉस्पिटल आहे जिथे मोफत डोळ्यांच्या शत्रक्रिया करण्यात येतात.
मंदिराचे काम अजून चालू आहे , तरी जून २०१८ च्या नंतर भेट दिल्यास तुम्हाला फायदा होईल.
नांदुरा कसे जायचे?
मुम्बई वरून येणार असाल तर विधर्ब एक्स्प्रेस किंवा अमरावती ने नांदुरा ला उतरून जाऊ शकता किंवा शेगाव वरून सुद्धा बस , रिक्षा आहेत.
खाली दिलेल्या लिंक वर फोटो पहावयास मिळतील.
महाकाय श्री हनुमान, नांदुरा
No comments:
Post a Comment