Translate this blog

banner

Tuesday, April 19, 2011

कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड

कलावंतीण दुर्ग 
20.2.2011 

ट्रेक कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड

कलावंतीण दुर्ग आणि प्रबळ गडला जायचा मार्ग....
साधारणपणे पनवेल पासून १४ किलोमीटर वर ठाकूरवाडी, तिथून पुढे प्रबळगड माची अंदाजे ३ किलोमीटर वर आहे.

नेहेमी प्रमाणे आम्ही preplanned होतो. पण या वेळेस आम्ही हा ट्रेक बाईक वरून करायचा ठरवला. मी कल्याण वरून निघालो, विजय आणि रविंद्र मला पनवेल ला भेटले.

सकाळी ६ वाजता मी पनवेलला पोहोचलो, गरमी होत असल्यामुळे सकाळी लवकर जायचे आम्ही ठरवले म्हणजे चढताना त्रास नाही होणार हा उद्येश.
सकाळी ८ वाजता आम्ही ठाकूरवाडी गावात पोहोचलो.
गावातच खन्ना नावाच्या सद्गृहस्थाने भगवान श्री कृष्णाचे छान मंदिर उभारले आहे. ते नक्की बघा. 


way towards prabalgad

मंदिर नुकतेच उघडले असल्याने बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही प्रबळ गड माचीच्या दिशेने निघालो.







प्रबळ गड माचीच्या पायथ्याशी बाईक लाऊन आम्ही निघालो, सकाळचे वातावरण फारच मोहक होते म्हणून ते क्षण टिपत आम्ही प्रबळगड माचीच्या दिशेने वाटचाल करू लागलो.








                                                                              
जाताना वाटेत कुईलीचे झाड लागले.  विजय कडून कुईलीच्या गमती जमती ऐकत आम्ही चढू लागलो.

माचीच्या पायथ्याशी बजरंगबलीचे उघडे मंदिर लागले. दर्शन घेतले थोडे फोटो शूट केले आणि आम्ही तिघेही निघालो.
प्रबळ माची हे साधारणपणे १५-२० घरे असलेले छोटेसे गाव. गावातच जेवणाची सोय होते. तरी सुद्धा शक्यतो जेवणाचे डबे आणि पाणी घेऊन जाणेच योग्य. उन्हाळा असल्याने खूप तहान लागत होती. पहिले प्रमाणे ठरवल्याने आणि दोन्ही किल्ले सर् करायचेच ह्या उद्देशाने आम्ही पेटून उठलो होतो.

कलावंतीण दुर्ग हा खालून पहिले असता छोटासा सुळका वाटतो पण जस जसे आपण त्याच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला त्याची महती पटते.
कलावंतीण दुर्गाच्या भक्कम आणि उंच पायऱ्या चढून आम्ही वर पोहोचलो. मस्त वारा सुटला होता. सुळक्यावरून चारहि बाजूला दुरवर मलंगगड, पेब, वानरलिंगी,नवरा नवरी, माहुलीचा किल्ला तसेच जवळच माथेरानचे पठार पण दिसते.   
किल्ले मलंग गड 

 exploration झाल्यावर लगेचच आम्ही खाली उतरू लागलो, सकाळचे ११ वाजले होते आणि उन हि तापले होते. परत प्रबळ गड माची वर येऊन आम्ही प्रबळ गडावर चढाई सुरु केली.
प्रबळगड हा नावाप्रमाणेच प्रबळ असा दुर्ग आहे. कलावंतीण दुर्गा पेक्षा हि उंच, भक्कम आणि मोठा हा किल्ला आहे.
किल्ले प्रबळ गड.
किल्ला सर् करता करता वाटेत काही वन्य जीव दिसले. साप होताच पण आमच्या समोर यायचे त्याची  हिम्मत झाली नाही, (बहुतेक त्याला माहित असावे, मला बघितले तर पोर इकडूनच खाली पळत सुटतील..... हा..हा....हा... ) पण त्याच्या माउशीने हे धाडस केले आणि तिचा फोटो काढायचे मी धाडस केले.

 थांबत, बसत एकमेकांना प्रोत्साहन देत आम्ही वरती पोहोचलो, वरती घनदाट जंगल आहे तसेच नागाची वारुळे देखील आहेत त्यामुळे चालताना सावध राहणेच हिताचे.

 वारुळे क्रोस करत आम्ही किल्ल्याच्या एका टोकाला आलो तिथे प्रबळगडाच्या बुरुजाचे दर्शन झाले.
त्याच पाउल वाटेने आम्ही पुढे गेलो, खूप दुरवर रस्ता शोधात शोधात आल्यावर ज्यासाठी आम्ही प्रबळ गड चढलो तो क्षण आला. प्रबळगडाच्या टोकावरून सुंदर असा कलावंतीण गडाचा सुळका दिसला, आणि तो बघून आम्ही तिघेही धन्य जाहलो.






काल्वान्तीन दुर्ग खुपच मोहक वाटत होता, त्यावरील पायऱ्या खुपच रेखीव दिसत होत्या.
तुमच्यासाठी काही फोटो उपलोड करत आहे.






 दुपारी ३ वाजता माचीच्या पायथ्याशी खाली येऊन बाईकला किक मारून सरळ घरी निघालो.

प्रबळगड / कलावंतीण गड येथे जाण्यासाठी पनवेल वरून शेदुंग फाट्यावरून आत वळणे,आणि तोच रस्ता सरळ ठाकूरवाडी ला जातो.
पनवेल ते ठाकूरवाडी बस आहे सकाळी ७ वाजता आणि येताना ४ वाजता आणि शेवटची ६ वाजता पनवेल बस आहे. खर्च रु. १०० ते २००/-


View Larger Map