Translate this blog

banner

Tuesday, August 30, 2011

Talgad fort and Kuda- Mandad caves



After two successful, memorable monsoon treks at Kalsubai pinnacle and Sudhagad forts this season, Paulwaata group decided to plan another picnic cum trek to enjoy the rains on 21st of August 2011. The destination was Talgad Fort along with Kuda- Mandad Buddhist caves located near Roha. The trek was deliberately planned considering the easy nature of the same as there were going to be new comers with us which happened to trek for the very first time.
We left from Chembur by our private vehicle (Maruti- Omni) at around 6 in the morning. Weather seemed to be very pleasant with in-between showers. We deliberately took the Vashi- Chirner route for Pen as it passes through mountains and offers a great view. We moved steadily with photography sessions throughout our trip.
Our destination was village Tala situated at the base of the fort Talgad. This village can be approached either from Roha side or from taking a right turn from village Indapur (around 135 kms)on Mumbai- Goa highway NH-17. Other group members (Kedar and Co.) were supposed to come from Alibag by their Esteem car and thus we decided to gather at Roha first, have a heavy breakfast and then proceed towards Talgad. So we took the left turn before Nagothane village on Goa highway and moved towards Roha village about 20 kms from that spot. The road was in pathetic condition with big potholes for first few kms. Later on it was an enjoyable ride as the road passed through a small Ghat which looked magnificent in monsoons with heavy forest surroundings.

While moving towards Roha, few of kms prior to Roha station and railway crossings, we halted for a few minutes at village Medha which happens to be the base village of fort Avchitgad. Took some snaps of the fort and decided to visit it in near future. We reached Roha by around 9.30 and waited for the other group to come. Due to the poor road conditions, the other group came late and meanwhile we had our breakfast in a nearby Hotel Dwaraka. Samosa, Kachori, Vada paav and finally Glass full of divine Lassi! Could not have asked for anything better! Few members were having Fast since it was a Janmashtami day so we ordered special Upwasacha Chiwada and Lassi for them. Meanwhile Kedar and co. turned up so we moved towards Tala village (19 kms from Roha) after they finished with their breakfast by around 11.

As soon as we left Roha, rain started to pour like anything and heavy showers made the driving quite difficult. Roads are in decent conditions only in patches which slowed down our progress. Finally we reached the Tala village by 12, asked the villagers about the route to the fort. The village Tala is divided into two parts viz. Tala and Pusati wadi. The fort can be approached from both the sides but there is direct motorable road form Pusati wadi side which takes you almost at the foot the fort. Thanks to our vehicles, which managed those steep climbs, we could reach the spot in hardly 5 odd minutes. A small temple is there where you can observe few cannon lying. People in this part are very friendly and co-operative! From back of the village, a trail leads you into the jungle where there is thick bamboo growth. Just after 100 odd steps, a trail starts climbing towards right to the fort. It takes hardly ten minutes to reach the fort from this point. All the new comers thoroughly enjoyed this and the experienced ones were shocked to see how little they had to climb! On our way, great views of the surroundings were on offer and we made sure that we capture them in our cameras. There is statue of Hanuman carved in a big rock near the entrance of the door possible for guarding the fort and welcoming us! There is also a secret tunnel near the entrance which the villagers claim to be connected to the base village. Also visible are the remains of a large gateway and a water tank which has now been filled up.


Basic information about Talgad fort:
             A fortified monument on the southern bank of Malti creek, the Tala fort lies east west at a height of 1000 feet above the sea level in Tala town in Maharashtra. The fort is separated from the rest of the hill by a wide gap. This protected monument of 4th century was built during the reign of Bhoja Raja and was used as a watch on the beautiful Rajpuri stream. Tala fort is a very good example for the artistic talents of the then generation. The bottom of the hill in which the fort situates is surrounded by thick woody forest. Once a center of prime importance, this marvelous construction stands as the relic of its past glory.


The fort is rarely visited by trekkers and thus thankfully you don’t come across with plastic bags, bottles and scraps things like these on this fort!  Hope it remains like this, untouched! After climbing the steps and entering the fort, we can see the main tower of the fort which is now in dilapidated condition and you can also see ruins of temple of Goddess Chandika near to that. We did lot of photography here. Great diversity of wild flowers can be seen on this fort and few members took snaps of them.  


Then we started moving towards the other end of the fort where there is a bastion. En route we came across a series of water tanks covered with algal blooms suggesting the water was not potable.  In all there are eleven water tanks. A small Shiva temple is next to the tanks.


After reaching the other end of the fort, the view was mesmerizing. Everyone wanted click snaps there and only after that we took some breather there and had mango drinks which we were carrying especially for the fasting people! We also had small introductory session here. Madhav had to respond to the call of the nature so he had vanished for few minutes!

It was already 2 pm by then so we decided to rush to the village as quickly as possible. Heavy non-stop pouring was making the descend very slippery. We got down in 20 odd minutes and moved towards Kuda- Mandad caves. To reach here, we took Tale- mandad road to the south of Tale village. The entire stretch from Talgad to the Kuda caves is a very interesting site and offers you great views of mountains and rivers. Mandad village is around 14 kms from Tala village. About few kms before Mandad, a kuccha road (Kuda Leni Phata) turns to the left and starts climbing the hill through the jungle. The motorable road is in poor condition so we moved as far as possible we can and then parked the vehicle and walked for next 10 odd mins.

  
Basic information about Kuda Caves:
             Kuda caves, famous for Buddhist caves. These rock cut caves are classic example of Buddhist cave art and amazing for their architectural excellence. These caves have two levels and the individual blocks are smaller and are on the upper levels. The inscriptions on the caves are the preaching of Buddha and his disciples. The interiors of the caves are carved with stupas and a rock carved image of an elephant as the janitor is inscribed on the front gate of the caves. In Kuda caves, there are evidences to testify that monks used them as dwelling places. The inscriptions, letters & paintings in the Kuda hills shows that these caves are built in during first to sixth centuary B.C.

There are a total of 13 caves in Kuda. Within the first cave, the walls of which are covered by ancient writing, is a stupa. This cave is much larger than the others. The sixth cave towards the left also has a stupa in it. This is the cave whose walls are adorned by elephants outside. There many bats inhabiting these beautiful caves so you prefer to enjoy them from outside only!
When you stand with your back towards the cave, Kuda village with the Murud creek in the backdrop is a clearly visible. This is great site especially in monsoons and the view is absolutely most picturesque.


We spent couple of hours here, took many photos and after changing in dry clothes (very much needed!) and having some CHYAU- MYAU tp food items, decided to move for our homes by 5.30 pm.


Considering the road conditions of towards Roha, we wisely decided to take Indapur road this time which is 15 kms from Tala village and said good byee to Kedar and co. who had to go to Alibag via Roha.

The road from Tala to Indapur is in excellent condition and we enjoyed this ride and wished had we come by same way in the morning we could have had more spare time and could have had visited Ghosalgad fort too! Nevertheless, whatever we had seen till now was quite refreshing and pleasant.

We set off from Indapur which is located on Mumbai- Goa highway by around 6.30 pm and moved towards Mumbai. We had our evening refreshments, tasty Misal paav, Potato chips at Hotel Kshudha Shanti at Wadkhal naaka at 8 pm. Finally reached Chembur by 10 pm. A very easy, non- strenuous enjoyable monsoon outing!

List of Participants:
Makarand, Mandar and Smita Pandhe, Meenal Redkar, Sonal Manohar, Kedar and Shweta Mhatre, Ashwin, Rohan and Madhav Upadhye

https://picasaweb.google.com/102433808384693001130/TalgadFortAndKudaMandadCaves

Saturday, August 20, 2011

ट्रेक सुधागड (७ जुलै २०११)


सुधागड 
कळसूबाईच्या यशस्वी ट्रेक नंतर पाउलवाटा ग्रुपचा हा दुसरा ट्रेक.. ट्रेक सुधागड (२०३० फुट)

या वेळेस आमच्या डोक्यात वेगळीच कल्पना होती, की हा ट्रेक बाईकवरून करायचा तसे प्लान्निंग हि झाले पण ऐन वेळेवर ठरवल्यापेक्षा जास्त सभासद जमा झाल्याने आम्ही मुंबईहून (चेम्बुर) मकरंदची ओम्नी गाडी करायचे ठरवले. आणि तसेच प्लान करून निघालो. इथे कल्याणवरून मी आणि विष्णू माझ्या बाईकवरून निघालो, तिकडे विजय आणि रविंद्र त्याची बाईक घेऊन येणार होते.
ठरवल्याप्रमाणे राउट सेट करून ७ जुलैला सकाळी ५ वाजता मी आणि विष्णू निघालो आणि तिकडे माधव आणि मंडळी मुंबईहून निघाले. कळंबोलीला आम्ही सगळे भेटलो आणि पुढचा प्रवास एकत्र केला. आमचा पुढचा स्टोप होता खोपोली. विजय,रवि पाली फाट्यावर भेटले...
सकाळी ९.३० वाजता पालीच्या गणपतीचे दर्शन घेतले, चहा नास्ता करून आम्ही सुधागडचा प्रवास सुरु केला. पाली मंदिराच्या बाहेरून जो मार्ग जातो तो सरळ सुधागाडला जातो. साधारणतः ८ किलो मीटर पुढे गेल्यावर दोंडसे फाटा लागतो तिथून डाव्या बाजूच्या रस्त्याने सरळ जावे लागते, पात्शापूर/ ठाकूरवाडी रस्ता पकडून आम्ही मार्गक्रमण करत निघालो. पालीपासून जवळजवळ १३ किलो मीटरवर ठाकूरवाडी हे गाव आहे. गाव छोटेसे असून होटेल ची सुविधा नाही, त्यामुळे दुपारी जेवणाचा डबा घेऊन निघणेच हिताचे. एक किराणा मालाचे दुकान असून तिथेच चहा मिळतो.
सकाळ असल्याने वातावरण पण स्वच्छ आणि प्रसन्न होते मुळात म्हणजे पाउस नव्हता.
गावातूनच किल्ल्यावर जायचा मार्ग आहे तसे पाहता पाच्छापूरहून(पातशहापूर)सुद्धा मार्ग आहे, आम्ही निवडला ठाकूरवाडी.

सुधागड किल्ल्याला ऐतेहासिक वारसा आहे. ह्या किल्ल्याला रायगडाची प्रतिकृती असे देखील म्हणतात. सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.

इतिहास

सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ. स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरूनसुधागड असे नामकरण केले.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणार्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.

पहाण्यासारखी ठिकाणे

वाडा
या गडाचा घेरा मोठा आहे.गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात.गडावर पंत सचिवांचा वाडा आहे.तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. येथे जंगलही ब-यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाडापासून पुढे पाय-यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात . जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाके आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे जाते. ही वाट मात्र आता अस्तित्वात नाही.
  • पाच्छापूर दरवाजा : या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच धान्यकोठारं,भाडांचे टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.
  • गडावरील टकमक टोक : वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते.या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा घनगड , कोरीगड, तैलबैल्या दिसतो. तसेच अंबा नदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.
चोर वाट 
  • दिंडी दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत.त्यावर सुबक नक्षीकाम आहे.

गडावर जाण्याच्या वाटा
    भोराई देवी
  • सवाष्णीचा घाट : तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि.मी. आहे. पालीहून धोंडसे गावी यावे.तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात.या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो.
  • नाणदांड घाट : एकोले गावातून घनगड डावीकडे ठेवून मावळती कडे निघावे.पुढे पाऊण तासाने नाणदांड घाटात पोहोचतो.पुढे एक बावधान गाव आहे. पुढे पाच्छापूरची दिशा धरून ठाकूरवाडीत यावे आणि मग गडमाथा अवघ्या दोन तासात गाठता येतो.


किल्ला तसा चढायला सोप्पा आहे. आम्ही जवळजवळ पाऊण तासात किल्ला सर् केला. आर्धा डोंगर सर् केला कि किल्ल्यावर जायला एक लोखंडी शिडी लागते, चढायला खुपच सोप्पी आणि सेफ अशी शिडी आहे.
फोटो काढत आम्ही पुढे पुढे जात होतो. काही वेळातच आम्ही वर आलो. किल्ला तसा खूप प्रशस्त आहे. तसेच किल्ल्यावर जुने बांधकाम् आढळते. वरती टकमक टोक, शिव मंदिर, पाण्याचे तळे, भोराई देवीचे मंदिर, महादरवाजा आहे. किल्ल्याला बुरुज आणि चोरवाटा आहेत. रस्ता बंद असल्याने आम्हाला महादरवाज्यात जाता नाही आले. माहिती मिळाल्याप्रमाणे दरवर्षी सुधागडावर भोराई देवीची यात्रा होते.

दुपारी वरती असलेल्या वाड्यात चहा आणि जेवण केले. (वर वाड्यात चहाची सोय होते.)
रिमझिम पाऊसात आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली. माधवने सोबत आणलेला आमचा खास पाहुणा (घोणस) तिथल्या दरीत सोडून संध्याकाळी ७ वाजता खाली उतरलो आणि फ्रेश होऊन आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो.
एकूण खर्च प्रत्येकी रुपये ३००/-(अंदाजे) ज्यात पेट्रोल, दुपारचे जेवण,चहा आणि नास्ता सामील आहे.  

सामील गडी:
निशांत, विष्णू (कल्याण)
रविंद्र, विजय (खोपोली)
माधव,मकरंद,मंदार,हर्षला,सोनल,मीनल,परणील .(मुंबई)






View Larger Map

Wednesday, July 13, 2011

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई ट्रेक....

९ जुलै २०११ 
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई ट्रेक..(५४०० फुट)


ट्रेकर्स मंडळी वार्मअप करण्यासाठी आणि पावसाळी ट्रेकिंग सीझनचा श्रीगणेशा करण्यासाठी नेहेमीच हलक्याफुलक्या परंतु तितक्याच प्रेक्षणीय जागेच्या शोधात असतात. आम्ही पाऊलवाटा चमूने निवडला - कळसुबाई!
रात्री १२च्या सुमारास माधव, मकरंद, विनायक आणि अक्षय ओम्नी गाडीने  मुंबईहून निघाले,आम्ही एकूण ९ जण होतो. चौघे मुंबईहून निघाले आणि आम्ही बाकीचे पाचजण कल्याणहून निघालो त्यात तिघे (विजय,रवींद्र,संदीप) खोपोलीचे आणि आम्ही दोघे (मी,विष्णू) कल्याणचे.
चेम्बुरहून निघालेल्या कार ने तासाभरात कल्याणला आम्हाला पिकअप केले. कल्याणला गाडीवर लावलेला भगवा झेंडा गाडीची शान वाढवू लागला.वाटेत कसारा बायपासला रात्री २च्या सुमारास चहा आणि  शेव भाजी वर ताव मारला. तासभर गप्पा रंगल्या. 


गाडीत बसल्याबसल्या पुन्हा आमच्या गप्पांचा विषय होता तो इकडचे सामसूम हायवे जिथे दरोडे पडतात म्हणून रात्री कोणीच गाडी न थांबवता सुसाट वेगाने निघून जातात, या विषयावर आमच्या गप्पा मस्त रमल्या,थोड्याच वेळात आमच्या पैकी बऱ्याच जणांना झोप लागली आणि जे नको व्हायला पाहिजे होते तेच झाले. घोटी वरून आत शिरल्यावर आम्ही रस्ता चुकलो होतो, मुख्य रस्ता सोडून आम्ही भलतीकडेच जात होतो. बरेच अंतर कापून गेल्यावर आम्हाला जाणीव झाली कि आम्ही रस्ता चुकलो आहोत. मधेच रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून कोणी मदत करते का ते बघण्यासाठी माधव खाली उतरला! जश्या काही वेळापूर्वी आमच्या गप्पा रंगल्या होत्या त्याचा अनुभव आम्हाला आलाच....कोणीच गाडी थांबवायला तयार नव्हते. आजू बाजूला किर्र अंधार होता आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. मनात नको नको ते विचार सुरु झालेच पण तितक्यात एक मोटारसायकलवाला तिथून चालला होता, त्याने गाडी थांबवून आम्हाला योग्य रस्त्यावर जाण्यास मदत केली तेव्हा सकाळचे ५ वाजले होते. त्या भल्या गृहस्ताला जय महाराष्ट्र! करून आम्ही बारीच्या दिशेने निघालो तेव्हा कुठे हायसे वाटले. पण..... तितक्यात नवीन संकट उभे राहिले! बारी ला पोहोचण्याच्या १०-१५ किलोमीटरच्या टप्प्यात  मकरंदला झोप येऊ लागली म्हणून माधवने गाडी चालवण्याचा निर्णय घेतला!! आणि आमचा जीव परत टांगणीला लागला. आयुष्यात प्रथमच गाडी चालवणाऱ्या माधव ने सार्यांनाच थरारक प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव दिला.
इगतपुरी-घोटी मार्गे ५.४५ च्या सुमारास बारी ह्या पायथ्याशी असलेल्या गावात आम्ही पोहोचलो. गरम गरम शेव पोहे आणि चहाचा नसता केला आणि गावातच जेवण तयार करण्यास सांगून ठेऊन ६.३०ला चढाई सुरु केली.

                                                                                                    कळसुबाई मंदिर
गुढगाभर थंडगार पाण्याचा ओढा पार करून मग गावामागील टेकडावर चढाई केली, पुढील ५ मिनिटातच पायथ्याशी कळसुबाई देवीचे मंदिर लागले, दर्शन घेऊन आणि थोडे फार फोटो काढत डावीकडील डोंगरावर आम्ही कूच केली. पाउस अविरत कोसालातच होता. थोडे अंतर पार करून गेल्यावर रेलिंग आणि लोखंडी शिड्या लागल्या तसेच बऱ्याच ठिकाणी पायऱ्याही होत्या. मधेच येणारा थंडगार वारा ट्रेक आनंददाई करत होता. दीड तासानंतर तीन शिड्या पार करून आम्ही विहिरी जवळ आलो. जरावेळ आराम करून अखेरची चढाई सुरु केली. पुढील २० मिनिटातच आम्ही शिखरावर पोहोचलो! वरती कळसुबाईचे देखणे भगव्या रंगातले मंदिर होते. वरती  प्रचंड गार-गार वारा सुटला होता...घोंगावणारा! बोचणारा!
थोडेफार फोटोशेशन झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, प्रसन्नता,कार्यपूर्तीबद्दल स्वतः विषयीचा अभिमान दिसत होता. शेवटी ९.३० वाजता खाली उतरायला प्रारंभ केला.सावकाश उतरत ११.३०च्या सुमारास गावात परतलो!
तासभर आराम केला, प्रत्येकाच्या मनात जुन्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या मग १ वाजता गावरान चिकन, मटकीची मसालेदार उसळ, भाकरी यावर भुकेल्या राक्षसांनी ताव मारला.१-२ तास वामकुक्षी झाल्यावर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.भंडारदरा धरणाला भेट देण्याचा विचार होता
परंतु तिथे असणाऱ्या संभाव्य गर्दीची शक्यता लक्षात
 घेऊन तो मोह आम्ही टाळला. दुपारी ३.१५ला बारीहून निघालो. संध्याकाळी ५.३०ला आम्ही कल्याण-भिवंडी बायपासला पोहोचलो, पुढे गरमागरम चहा घेऊन आम्ही पाचही जण कल्याणला परतलो आणि बाकीचे ६.३० च्या सुमारास मुंबईला पोहोचले. आमच्या ग्रुप मधील मकरंदचे विशेष कौतुक कारण त्याने ट्रेकिंग सोबत ७ एक तास न कांटाळताना छान सेफ अशी ड्रायविंग देखील केली व आमचा प्रवास सोपा केला आणि त्याला माधवने  देखील गाडी चालवायला छान साथ दिली. गाडीतून परतताना आमच्या डोक्यात विचार होते ते कि ट्रेक चे पुढचे ठिकाण कोणते ह्याचे.     
सामील गडी:
निशांत, विजय, विष्णू,रवींद्र (मकरध्वज) ,संदीप,माधव,विनायक,अक्षय आणि मकरंद.

प्रवासाचा एकूण खर्च माणशी ५०० रुपये ज्यामध्ये पेट्रोल, रात्रीचा अल्पोपहार,सकाळची न्याहारी, शिखराजवळची कांदाभजी आणि चहा आणि दुपारचे पोटभर जेवण समाविष्ट होते.





View Larger Map

Tuesday, June 28, 2011

किल्ले तिकोणा

५ जून २०११

किल्ले तिकोणा

बऱ्याच महिन्यांनी आम्हाला शिखर वेध सोबत ट्रेकला जायचा योग आला. म्हणून मी, रविंद्र खूप excite झालो होतो. पण या वेळेस आमचा पार्टनर विजय नव्हता. शिखर वेध ग्रुपचा ओनर जगदीश पाटील याने पाठवलेल्या मेल प्रमाणे मी आणि रविंद्र ने खोपोलीला भेटायचे ठरवले. मी कल्याणवरून सकाळी ५.४० च्या खोपोली ट्रेन ने निघालो.खोपोली ते लोणावळा असा बस ने प्रवास करून पुढे लोणावळा ते कामशेत पुणे लोकल ट्रेनने निघालो. लोणावळाच्यापुढे मळवली नंतर कामशेत. काही जण मुंबईवरून बस ने, काही जण इंद्रायणी एक्सप्रेसने तर काही जण पुण्यावरून यायला निघाले. प्रवासातच काही जणांची ओळख झाली, नवे मित्र मैत्रिणी मिळाल्या. सुमेघ,वर्षा,रोशनी असे बरेच मित्र मिळाले. आमचा दुसरा मीटिंग पोइंट होता कामशेत.
इंद्रायणी नदी 

काही जण पुण्याहून ट्रेन ने येणार होते आणि ट्रेन यायला आर्धा तास बाकी होता म्हणून कॅमेरा काढला आणि थोडे फार शूट सुरु केले. रवींद्रने सांगितल्या प्रमाणेच बाजूने इंद्रायणी नदी वाहात होती. तिचा पण फोटो काढायचा मोह मला झाला. 



कामशेत रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच एक शंकराचे मंदिर होते, असे म्हणतात कि ते मंदिर आहिल्याबाई होळकरांच्या काळातील आहे.

बाकीची मंडळी आल्यावर आम्ही छोटा हत्ती (Public Transport)ने निघालो. जाताना मध्येच पावणा धरण लागले हे तेच धरण आहे जे लोहगडावरून दिसते. ५ वर्षांनतर मला तिकोणाला जायचा योग आला. वळणदार रस्त्यावरून जाताना मागे बघितले तर काही जण बाईक घेऊन आमच्या मागे येत होते, नंतर समझले कि ते आमच्याच ग्रुप मधले आहेत आणि पुण्याला राहतात. बघितले इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो.



किल्ल्याच्या पायथ्याशी गडकरी राहतात, त्यांच्याकडे कांदापोहे आणि मस्त गरमागरम चाह घेऊन आम्ही किल्ल्याचा दिशेने वाटचाल सुरु केली.
नावाप्रमाणेच दुरून किल्ला त्रिकोणी दिसत होता. बहुकेत त्याच्या ह्याच आकारामुळे ह्या गडाला  तिकोना हे नाव पडले असावे.
चालता चालता फोटो काढणे, गमती जमती तसेच कोणाचे काय प्रोफाइल आहे या बद्धल बोलत आम्ही चढू लागलो. पायथ्याशीच काही स्वयंसेवक भेटले. किल्ल्यावर चाललेच्या बांधकामासाठी विटा वरती न्यायच्या होत्या, म्हणून आम्ही सर्वांनी  
स्वेच्छेने विटा नेण्याचे ठरवल्याप्रमाणे प्रत्येकाने २-२ विटा उचलल्या.




चपेटदान मारुती  
पाऊस नुकताच सुरु झाला होता आणि हिरवळ दिसू लागली होती म्हणून किल्ला आणखीच सुंदर दिसत होता. किल्ल्यावर बजरंग बलीची (चपेटदान मारुती) दगडात कोरलेली मूर्ती आहे.
माहिती मिळाल्या प्रमाणे मूर्तीचा अर्थ असा होतो कि “चपेटदान मारुती: चापट मारण्याच्या आवेशात असलेला मारुती. याच्या पायाखाली ‘पनवती’ नामक राक्षशीण आहे असे मानले जाते.







थोडे पुढे गेलो आणि चुण्याचा घाणा (Lime Mixer) दिसला.
साधारणत: सर्व किल्ल्यांवर आणि खेडेगावात चुण्याचा घाणा असतो. या मध्ये एक ते दोन चाके असतात. चुना, वाळू व गुळ हे प्रमुख घटक वापरण्यात येतात. इतर घटक उदा: कात,बेल,बिबा हे कामाचे स्वरूप आणि वातावरण पाहून घासले जातात. सदर घाणा हा बैलांच्या सहाय्याने फिरवला जातो.  आपण पहात असलेला घाणा हा संवर्धन काम करताना स्वच्छ करण्यात आला आहे. 




थोडे आणखी पुढे गेलो आणि तुळजाभवानी ची गुंफा लागली.

तुळजाभवानीची गुंफा: (लेणी)
हे हिंदू पद्धतीची लेणे आहेत. हे लेणे सातवाहन काळानंतर कोरले असावे.लेण्याच्या पश्चिमेस प्रस्त्र्रात पाण्याचे टाके आहे. या मध्ये एकूण पाच गुंफा आहेत.पैकी १ अर्धवट आहे.देवीच्या गुंफेमधील छताला कमलदल कोरले आहे.लेण्यांचे काम अर्धवट सोडले असावे असे तज्ञांचे मत आहे.

पुढे आम्हाला लागला तो तीकोणाचा बाले किल्ला. त्याची चढण सरळ आणि उंच होती. चढण्यासाठी कडेकडेला सपोर्टसाठी वायर बांधली होती. बाले किल्ला चढून गेलो आणि पुढे मुख्य दरवाजा दिसला.








किल्ल्यावर भगवान शंकराचे मंदिर आणि पाण्याचे टाके असून वरील परिसर ओसाड आहे.

पावसाळा असल्यामुळे ढग दाटून आले होते. दूर पाउस पडत होता आणि त्याचा आवाज किल्ल्यावर येत होता. खूप सुंदर आणि मोहक दृश्य होते ते.


किल्ल्यावर exploration करून आम्ही उतरू लागलो. सोप्पा ट्रेक असल्यामुळे चढायला १ तास आणि उतरायला ४५ मिनिट लागले असावेत. 
किल्ल्यावरून उतरलो आणि हात मारला तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या करवंदाच्या झाडावर आणि आंब्याच्या झाडावर. भरपूर कैऱ्या तोडून आम्ही निघालो. पुन्हा खाली येऊन गाड्कारींकडे मस्त वरण भात, चपाती आणि भाजी खाऊन परतीच्या प्रवासाला लागलो. टम टम केली होती तिनेच परतलो. संध्याकाळी ५.३०च्या पुणे लोणावळा लोकल ट्रेनने आम्ही लोणावळ्याला आलो, सगळ्यांचा निरोप घेऊन आणि मेल आयडी घेऊन रविंद्र आणि मी बसने खोपोलीला परतलो. मस्त गरम चहा आणि वडापाव खाऊन मी कल्याण ट्रेन पकडून निघालो.
या ट्रेकसाठी येणारा खर्च प्रत्येकी रुपये ३००/-(अंदाजे)






View Larger Map

Tuesday, June 21, 2011

Wallpapers Download


Instruction to download: Open thumbnail image right click and select Save as. Waiting for your comments. If you like this album then kindly post comments and your suggestions.
Thanks,
Nishant Potdar