५ जून २०११
किल्ले तिकोणा
बऱ्याच महिन्यांनी आम्हाला शिखर वेध सोबत ट्रेकला जायचा योग आला. म्हणून मी, रविंद्र खूप excite झालो होतो. पण या वेळेस आमचा पार्टनर विजय नव्हता. शिखर वेध ग्रुपचा ओनर जगदीश पाटील याने पाठवलेल्या मेल प्रमाणे मी आणि रविंद्र ने खोपोलीला भेटायचे ठरवले. मी कल्याणवरून सकाळी ५.४० च्या खोपोली ट्रेन ने निघालो.खोपोली ते लोणावळा असा बस ने प्रवास करून पुढे लोणावळा ते कामशेत पुणे लोकल ट्रेनने निघालो. लोणावळाच्यापुढे मळवली नंतर कामशेत. काही जण मुंबईवरून बस ने, काही जण इंद्रायणी एक्सप्रेसने तर काही जण पुण्यावरून यायला निघाले. प्रवासातच काही जणांची ओळख झाली, नवे मित्र मैत्रिणी मिळाल्या. सुमेघ,वर्षा,रोशनी असे बरेच मित्र मिळाले. आमचा दुसरा मीटिंग पोइंट होता कामशेत.
काही जण पुण्याहून ट्रेन ने येणार होते आणि ट्रेन यायला आर्धा तास बाकी होता म्हणून कॅमेरा काढला आणि थोडे फार शूट सुरु केले. रवींद्रने सांगितल्या प्रमाणेच बाजूने इंद्रायणी नदी वाहात होती. तिचा पण फोटो काढायचा मोह मला झाला.
किल्ल्याच्या पायथ्याशी गडकरी राहतात, त्यांच्याकडे कांदापोहे आणि मस्त गरमागरम चाह घेऊन आम्ही किल्ल्याचा दिशेने वाटचाल सुरु केली.
नावाप्रमाणेच दुरून किल्ला त्रिकोणी दिसत होता. बहुकेत त्याच्या ह्याच आकारामुळे ह्या गडाला तिकोना हे नाव पडले असावे.
चालता चालता फोटो काढणे, गमती जमती तसेच कोणाचे काय प्रोफाइल आहे या बद्धल बोलत आम्ही चढू लागलो. पायथ्याशीच काही स्वयंसेवक भेटले. किल्ल्यावर चाललेच्या बांधकामासाठी विटा वरती न्यायच्या होत्या, म्हणून आम्ही सर्वांनी
स्वेच्छेने विटा नेण्याचे ठरवल्याप्रमाणे प्रत्येकाने २-२ विटा उचलल्या.
थोडे पुढे गेलो आणि चुण्याचा घाणा (Lime Mixer) दिसला.
किल्ल्यावर exploration करून आम्ही उतरू लागलो. सोप्पा ट्रेक असल्यामुळे चढायला १ तास आणि उतरायला ४५ मिनिट लागले असावेत.
किल्ल्यावरून उतरलो आणि हात मारला तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या करवंदाच्या झाडावर आणि आंब्याच्या झाडावर. भरपूर कैऱ्या तोडून आम्ही निघालो. पुन्हा खाली येऊन गाड्कारींकडे मस्त वरण भात, चपाती आणि भाजी खाऊन परतीच्या प्रवासाला लागलो. टम टम केली होती तिनेच परतलो. संध्याकाळी ५.३०च्या पुणे लोणावळा लोकल ट्रेनने आम्ही लोणावळ्याला आलो, सगळ्यांचा निरोप घेऊन आणि मेल आयडी घेऊन रविंद्र आणि मी बसने खोपोलीला परतलो. मस्त गरम चहा आणि वडापाव खाऊन मी कल्याण ट्रेन पकडून निघालो.
View Larger Map
किल्ले तिकोणा
बऱ्याच महिन्यांनी आम्हाला शिखर वेध सोबत ट्रेकला जायचा योग आला. म्हणून मी, रविंद्र खूप excite झालो होतो. पण या वेळेस आमचा पार्टनर विजय नव्हता. शिखर वेध ग्रुपचा ओनर जगदीश पाटील याने पाठवलेल्या मेल प्रमाणे मी आणि रविंद्र ने खोपोलीला भेटायचे ठरवले. मी कल्याणवरून सकाळी ५.४० च्या खोपोली ट्रेन ने निघालो.खोपोली ते लोणावळा असा बस ने प्रवास करून पुढे लोणावळा ते कामशेत पुणे लोकल ट्रेनने निघालो. लोणावळाच्यापुढे मळवली नंतर कामशेत. काही जण मुंबईवरून बस ने, काही जण इंद्रायणी एक्सप्रेसने तर काही जण पुण्यावरून यायला निघाले. प्रवासातच काही जणांची ओळख झाली, नवे मित्र मैत्रिणी मिळाल्या. सुमेघ,वर्षा,रोशनी असे बरेच मित्र मिळाले. आमचा दुसरा मीटिंग पोइंट होता कामशेत.
इंद्रायणी नदी |
काही जण पुण्याहून ट्रेन ने येणार होते आणि ट्रेन यायला आर्धा तास बाकी होता म्हणून कॅमेरा काढला आणि थोडे फार शूट सुरु केले. रवींद्रने सांगितल्या प्रमाणेच बाजूने इंद्रायणी नदी वाहात होती. तिचा पण फोटो काढायचा मोह मला झाला.
कामशेत रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच एक शंकराचे मंदिर होते, असे म्हणतात कि ते मंदिर आहिल्याबाई होळकरांच्या काळातील आहे.
बाकीची मंडळी आल्यावर आम्ही छोटा हत्ती (Public Transport)ने निघालो. जाताना मध्येच पावणा धरण लागले हे तेच धरण आहे जे लोहगडावरून दिसते. ५ वर्षांनतर मला तिकोणाला जायचा योग आला. वळणदार रस्त्यावरून जाताना मागे बघितले तर काही जण बाईक घेऊन आमच्या मागे येत होते, नंतर समझले कि ते आमच्याच ग्रुप मधले आहेत आणि पुण्याला राहतात. बघितले इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो.
नावाप्रमाणेच दुरून किल्ला त्रिकोणी दिसत होता. बहुकेत त्याच्या ह्याच आकारामुळे ह्या गडाला तिकोना हे नाव पडले असावे.
चालता चालता फोटो काढणे, गमती जमती तसेच कोणाचे काय प्रोफाइल आहे या बद्धल बोलत आम्ही चढू लागलो. पायथ्याशीच काही स्वयंसेवक भेटले. किल्ल्यावर चाललेच्या बांधकामासाठी विटा वरती न्यायच्या होत्या, म्हणून आम्ही सर्वांनी
स्वेच्छेने विटा नेण्याचे ठरवल्याप्रमाणे प्रत्येकाने २-२ विटा उचलल्या.
चपेटदान मारुती |
पाऊस नुकताच सुरु झाला होता आणि हिरवळ दिसू लागली होती म्हणून किल्ला आणखीच सुंदर दिसत होता. किल्ल्यावर बजरंग बलीची (चपेटदान मारुती) दगडात कोरलेली मूर्ती आहे.
माहिती मिळाल्या प्रमाणे मूर्तीचा अर्थ असा होतो कि “चपेटदान मारुती: चापट मारण्याच्या आवेशात असलेला मारुती. याच्या पायाखाली ‘पनवती’ नामक राक्षशीण आहे असे मानले जाते.
थोडे पुढे गेलो आणि चुण्याचा घाणा (Lime Mixer) दिसला.
साधारणत: सर्व किल्ल्यांवर आणि खेडेगावात चुण्याचा घाणा असतो. या मध्ये एक ते दोन चाके असतात. चुना, वाळू व गुळ हे प्रमुख घटक वापरण्यात येतात. इतर घटक उदा: कात,बेल,बिबा हे कामाचे स्वरूप आणि वातावरण पाहून घासले जातात. सदर घाणा हा बैलांच्या सहाय्याने फिरवला जातो. आपण पहात असलेला घाणा हा संवर्धन काम करताना स्वच्छ करण्यात आला आहे.
तुळजाभवानीची गुंफा: (लेणी)
हे हिंदू पद्धतीची लेणे आहेत. हे लेणे सातवाहन काळानंतर कोरले असावे.लेण्याच्या पश्चिमेस प्रस्त्र्रात पाण्याचे टाके आहे. या मध्ये एकूण पाच गुंफा आहेत.पैकी १ अर्धवट आहे.देवीच्या गुंफेमधील छताला कमलदल कोरले आहे.लेण्यांचे काम अर्धवट सोडले असावे असे तज्ञांचे मत आहे.
पुढे आम्हाला लागला तो तीकोणाचा बाले किल्ला. त्याची चढण सरळ आणि उंच होती. चढण्यासाठी कडेकडेला सपोर्टसाठी वायर बांधली होती. बाले किल्ला चढून गेलो आणि पुढे मुख्य दरवाजा दिसला.
पावसाळा असल्यामुळे ढग दाटून आले होते. दूर पाउस पडत होता आणि त्याचा आवाज किल्ल्यावर येत होता. खूप सुंदर आणि मोहक दृश्य होते ते.
किल्ल्यावरून उतरलो आणि हात मारला तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या करवंदाच्या झाडावर आणि आंब्याच्या झाडावर. भरपूर कैऱ्या तोडून आम्ही निघालो. पुन्हा खाली येऊन गाड्कारींकडे मस्त वरण भात, चपाती आणि भाजी खाऊन परतीच्या प्रवासाला लागलो. टम टम केली होती तिनेच परतलो. संध्याकाळी ५.३०च्या पुणे लोणावळा लोकल ट्रेनने आम्ही लोणावळ्याला आलो, सगळ्यांचा निरोप घेऊन आणि मेल आयडी घेऊन रविंद्र आणि मी बसने खोपोलीला परतलो. मस्त गरम चहा आणि वडापाव खाऊन मी कल्याण ट्रेन पकडून निघालो.
या ट्रेकसाठी येणारा खर्च प्रत्येकी रुपये ३००/-(अंदाजे)
View Larger Map
No comments:
Post a Comment