Translate this blog

banner

Monday, July 6, 2015

सगुणा बाग





बर्‍याच दिवसापासून कुठेतरी जायचं होतं पण प्लान बनत नव्हता आणि वेळ हि मिळत नव्हता.. म्हणून लगेच या आठवड्यात प्लान बनवला तो पण मी नाही... या वेळेस आमच्या सौ ने.. :D आणि स्पाॅट ठरवला कर्जत जवळचा सगुणा बाग.   


येथे जाण्यासाठी २ दिवस आधी बुकिंग करावं लागते. तसं बुकिंग करून या शनिवारी आम्ही गेलो होतो. One day picnic साठी सकाळी ९ ते ५ हि वेळ आहे. 


सकाळच्या खोपोली ट्रेनने आम्ही नेरळ ला उतरलो.  नेरळ पश्चिम ला बाहेर पडला असता बस स्टैंड वरून स्पेशल रिक्शा मिळतात. जाताना १०० आणि परतताना १३० हे दर ठरलेलेच आहेत त्यामूळे रिक्शाचालकांशी हुज्जत घालण्यास वेळ घालवू नका. 

जवळजवळ १० मिनिटांत आम्ही सगुणा बागेत आलो. आत entry केल्या केल्या गावाला आल्याचा feel येतो. Reception counter वरची व्यक्ति आपले निट स्वागत करुन व्यवस्थित माहिती देते. 

जवळच बॅग ठेवण्यासाठी लाॅकर ची व्यवस्था केली आहे. १०० deposit देऊन तुम्ही लाॅकर घेऊ शकता. लगेच फ्रेश होऊन breakfast कडे मोर्चा वळवला. मस्तपैकी पोहे आणि इडली सांबार वर ताव मारून माहितीसाठी गाईड घेतला आणि आम्ही फिरायला निघालो. 





थोडा अबोला असलेला आमचा गाइड रोहन हळुहळु गप्पा मारण्यात आणि माहिती देण्यात चांगलाच रमला.... अनेक प्रकारच्या झाडांची आणि वनस्पतींची माहिती द्यायला सुरुवात केली. जसजसे पुढे जात होतो तसतशी न पाहिलेली फुले, वनस्पति झाडे दिसू लागली. 


जवळजवळ ५० एकरच्या परिसरात सगुणा बाग पसरली आहे. Explore करताना आणि फोटो काढताना मजा येत होती. 


मधेच बैलगाडी वरून रपेट मारली.. तेव्हा जूने दिवस आठवले... लहानपणी ऊन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हां गावाला जायचो आणि फुकटात कुणाच्याही बैलगाडीत बसून गाव हुंदडायचो. 

फिरत फिरत पुन्हा मेन गेट जवळ आलो तेथे मस्तपैकी थंडगार कोकम सरबताची व्यवस्था केली होती.  सरबत पिउन आम्ही पुढे निघलो…
मल्लखांब चे practical बघून आम्हाला गाइड ने एका तलावाजवळ थांबण्यास सांगितले जिथे मोठे मासे दाखवण्याचा कार्यक्रम होणार होता. थोड्याच वेळात काही मुलांनी पाण्यात उतरून अनेक जातींचे मासे दाखवले त्यात पिरान्हा पण होता. 


शो संपल्यावर आम्हाला उल्हास नदीवर नेले त्यापूर्वी चहा काॅफी ब्रेक ऊरकला..


नदीवर swimming, buffalo riding आणि boating होते. सगळे म्हशीवरुन फिरण्यात गुंग होते तेव्हा आम्ही सेल्फी काढण्यात बिझी होतो. जवळजवळ २ तासांनंतर जेवण होतं. साॅल्लीड भूक लागली होती म्हणून मस्तपैकी चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेतला. 



जेवणानंतर काहि वेळात snake show होता. ३ जातींचे सर्प आम्हाला दाखविण्यात आले. नागाची, धामणीची आणि खोडसे (viper) ची माहिती छान समजावुन सांगितली तसेच नंतर काहि अति उत्साही पर्याटकांनी सापाला अंगावर घेऊन सेल्फी काढल्या...


आमचा नंतर चा schedule होते बोटिंग आणि fishing


एका छोट्याशा तलावात पैंडल मारता येणारी बोट होती. Boating करून नंतर थोडीफार shopping करुन आम्ही घरी निघालो.







सगुणा बागेत कसं जायचं?
रेल्वे ने जाणार असाल तर central railway च्या नेरळ (माथेरान) स्टेशन वर उतरून वेस्ट ला बाहेर पडुन रिक्शा मिळेल. १०० जाताना आणि परतताना १३०/-.
अधिक माहितीसाठी www.sagunabaug.com येथे भेट देणे.

धन्यवाद...
निशांत पोतदार


लेख कसा वाटला ते नक्की सांगणे.