Translate this blog

banner

Saturday, March 26, 2016

Royal Enfield Ride to Palghar



नमस्कार..

१५ डिसेंबर २०१५ रोजी मी SR Motors उल्हासनगर येथून नवी कोरी क्लासिक ३५० सीसी बुलेट विकत घेतली होती तेव्हा कळाले कि SR Motors bullet rides पण काढतात. पण मला जायचा योग येत नव्हता, शेवटी तिथेच काम करणारे श्री सुहास मोरे यांनी मला पालघर राईड बद्दल सांगितले तसेच SR Motors च्या group मध्ये add केले.  जवळ जवळ ३० जणांनी confirmation दिले.

ठरल्याप्रमाणे पहाटे ५.४५ ला showroom च्या बाहेर भेटायचे ठरले. एकेक करून सर्वजण जमले. काही वेळात ठाणे घोडबंदर मार्गे पालघर ला जायला आम्ही निघालो.

माझी हि पहिलीच बुलेट राईड. सुरुवात चांगली झाली. रोहित प्रत्येकाला गाडीचे पेपर जवळ असण्याच्या सूचना देत होता. 
एका मागे एक येणाऱ्या बुलेट पाहून लोकं आमच्याकडे पाहत होती. कुठेतरी मला सुद्धा जाणवले कि काही काळापूर्वी मी पण त्यांच्यातलाच एक होतो. असा ग्रुप जाताना पहिला कि वाटायचे मला सुद्धा जायला आवडेल पण गाडी नव्हती....

पुढे घोडबंदर रोड वर उतरून rout set केला. आतिश ने सर्वांना राईड instructions दिल्या.
काहीवेळ तिथे थांबून फोटो काढले, सकाळचे फ्रेश वातावरण आणि बुलेट राईड... क्या combination.. 
मज्जा आली. पुढचा आमचा स्टोप होता हॉटेल फौंटन, ठाणे.

हॉटेल ऐन मोक्याच्या जागेवर होते. फटाफट सर्वांनी नाष्टा ओर्डर केला. अर्धातास थांबून आम्ही सर्व निघालो. एका सरळ रेषेत उभ्या बुलेट पाहून लोकांच्या नजरा गाड्यांकडे वळल्या आणि त्यांना पण आमच्या गाड्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. 
थोडावेळ फोटो काढून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.

या राईड मध्ये मला सर्वात जास्त आवडले ती शिस्त.. येणारा प्रत्येकजण हा राईडर होता तरी सुद्धा सरळ एका लाईनीत गाडी चालवत होते. त्यात ३ लीड होते एक सर्वात पुढे एक मध्ये आणि एक शेवटी...

रोड मस्तच होता.. एकदम सुस्साट तरी सुद्धा सर्वजण जवळजवळ एकाच स्पीड मध्ये गाडी चालवत होते. राईड चे आणखी एक गोष्ट मी mark केली ती म्हणजे भले उजाडले असेल तरीसुद्धा सर्वांचे headlamp चालू होते. त्यामागे सुद्धा एक कारण आहे ते म्हणजे मागून येणारा आपला राईडर mirror मध्ये दिसला पाहिजे आणि group member सहजासहजी ओळखता येतो.

एकमेकांचे cooperation and support was mind-blowing.   

एक एक तासांचे break घेत आम्ही पालघर ला चाललो होतो. मधेच वळणदार रोड तर मधेच सरळ रस्ता येत होता. प्रत्येक वळणावर एक नवीन अनुभव येत होता. मधेच एक घाट लागला तो उतरलो कि आपण सफाळे ला निघतो.
पुढे केळवे रोड रेल्वे स्टेशन लागले. बाजूच्या रोड ने सरळ गावातून केळवे बिच वर जायचा रोड आहे. गावातून जाताना जुने दिवस आठवले जेव्हा मामा/माउशीच्या घरी जायचो.

आणि शेवटी आम्ही destination गाठले. सकाळचे १० वाजले होते. मस्त सोसाट्याचा वारा पण सुटला होता त्यामुळे लांबच्या प्रवासाचा थकवा बिल्कुल जाणवला नाही. 

भरपूर फोटो काढले नंतर बिचवर फिरून परतीच्या प्रवासाला निघालो. मधेच एका छान रेसोर्टमध्ये जेवायला उतरलो.
जेवतानाच अतिश आणि सुरेश राव यांनी पुढची ट्रीप फायनल केली. ३ दिवस तारकर्ली, कोकण १००० किमी राईड. इथे जायचा मी १००% प्रयत्न करणार. :) :)  

जेवून दुपारी ३.३० ला आम्ही निघालो आणि direct फौंटन हॉटेललाच भेटायचे ठरले. रस्ता जवळजवळ माहितीच होता म्हणून प्रत्येकजण सुसाट पण शिस्तीत जात होता.

संध्याकाळी ६ वाजता हॉटेलमध्ये चहा/ कॉफी घेऊन सगळ्यांना हाय बाय करत परतीच्या प्रवासाला निघालो.

तुम्ही इंटरेस्टेड आहात बुलेट राईडसाठी? मग SR Motors उल्हासनगर ला भेट द्या तिथे अतिश (Manager) किंवा सुहास मोरे भेटतील. 

नोट: 
1.राईडला  जाताना शक्यतो riding (safety) jacket, gloves, knee guards and sunglasses असणे केव्हा हि योग्य आणि Helmet is MUST.
2. आगाऊ riders ला इथे पुन्हा बोलावले जात नाही. :)
 

ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की कळवा.

धन्यवाद,
निशांत पोतदार
www.fb.com/nishantpotdar
Instagram: @thenishantpotdar
पाऊलवाटा पेज लाईक करायला विसरू नका: www.fb.com/paaulwata

Have a Happy and Safe riding..




 

Tuesday, March 1, 2016

दिंडीगड शिवमंदिर


नमस्कार...
पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनंतर एक छोटा ट्रेक घेऊन आलोय.

बरेच दिवस झाले होते कुठे मागच्या पावसाळ्यात कुठे तरी जायचे होते पण जाणार कुठे?  Option सुचत नव्हता.. एके दिवशी बाल्कनीत उभा राहून असेच दूर पाहत असताना मला एक मंदिर दिसले .. उंच आणि हिरव्यागार डोंगरावर एक टूमदार असे छोटे देऊळ होत ते. बऱ्याचवेळा ठाणे नाशिक हायवेवरून दिसायचे पण कसे जायचे ते माहित नव्हते.
 शेवटी बाल्कनीत उभा उभा राहुन मोबाईलच्या होकायंत्राचा (Compass) चा वापर करून location शोधले. पुढे google map वापरून रस्ता मिळवला...
त्या मंदिराचे नाव होते दिन्डीगड शिवमंदिर..

बस्स... ठरले.. मित्राला विचारले आणि तो हि हसत हसत हो म्हणाला.. दिवस ठरला..
९ ऑगस्ट २०१५

आदल्या दिवशी रात्री सगळी तय्यारी करून ठेवली होती..  map पण download करून ठेवला होता म्हणजे ऐन वेळेवर पंचाईत नको..

ठरल्या प्रमाणे सकाळी विजयला वायले नगर, कल्याण वरून pick केले आणि दुर्गाडी मार्गे आम्ही मुंबई-नाशिक हायवे ला आलो. पुढे सरळ भिवंडी रोड पकडून सोनाळे गावात गेलो... रस्ता थोडा खराब होता पण इंग्रजीत एक म्हण आहे ना.. "Where there is a will there is a way.."  डोंगराच्या पायथ्याशी MIDC area  असल्याने थोडी घाण आहे. केमिकल आणि रस्त्यांवर सांडलेल्या ग्रीस, डीजेल मुळे रस्ते थोडे निसरडे होते आणि पाऊस
असल्याने चिखल हि होता त्यामुळे बाईक नीट चढत नव्हती. शेवटी दुसऱ्याच एका रस्त्याने जाऊन गाडी डोंगराच्या पायथ्याशी उभी करून पुढे चालत मार्गक्रमण केले.

पावसाळा असल्याने वातावरण छानच होते. दूर पावसाने भरलेले काळे ढग दिसत होते.
मंदिराच्या दिशेने चालणे सुरु केले कि पहिले लागतो तो ह.भ.प. चिंतामणी महाराज पाटील यांचा आश्रम आणि गोशाळा.
मंदिराच्या दिशेने जाताना थोडे

गोंधळल्यासारखे होऊ शकते कारण थोडे पुढे आल्यावर दोन फाटे फुटतात, आपण डाव्या दिशेने चालणे सुरु ठेवा... थोडे वर आलो आणि तहान लागली आणि ऊन पडल्यामुळे विजय थकला :)  थोडे फोटो काढून त्याला boost केला.


जस जसे वर जातो तसे आपण कोकणात आल्याचा भास होतो.. आणि का नाही होणार वातावरणच तसे होते. गर्द हिरवी झाडी, बाजूला छोटी का होई ना पण दरी होती. मधेच वारा सुटायचा.. थोडे पुढे सरकलो आणि म्याव म्याव असा आवाज येऊ लागला... तेव्हा बाजूने जाणाऱ्या साधू बाबा ला विचारले तेव्हा तिथे मोर असल्याचे आम्हाला कळाले..

video shoot करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.. पण तेव्हा मोर काही ओरडले नाहीत.  पूर्ण शांतता असल्यास मोर ओरडल्याचा आवाज नक्की येतो. आम्ही ऐकला पण रेकॉर्ड करायला नाही मिळाला.
असो..

 वाटेत जाताना शंकराचे एक छोटे मंदिर लागते. तिथून डाव्या बाजूने पुढे जायचे.
थोडी उंच आणि निसरडी चढण आहे.. हि चढण एकदा पार केली कि आपण जवळजवळ मंदिराच्या पायथ्याशीच असतो.

नेहेमीप्रमाणे फोटो काढत आम्ही मंदिराच्या पायथ्याशी आलो..

मंदिरच्या बाहेर सभा मंडप बनवलेला आहे, थोडे काम बाकी आहे. आजूबाजूला संपूर्णपणे हिरवा निसर्ग आहे.  भगवान शंकराचे मंदिर हि साधेच आहे.
दर्शन घेऊन झाल्यावर मंदिराबाहेरचे वातावरण अचानक बदलले... सगळीकडे काळे ढग पसरले आणि जे मी काही वर्ष मिस केले ते मला अनुभवायला मिळाले. मंदिराच्या सभामंडपात चारी बाजूने ढग आत यायला लागले.. जणू काही स्वर्गात असल्याचा भास होत होता.  थोड्यावेळात पाउस सुरु झाला आणि हा निसर्गाचा बदल मला अनुभवता पण आला आणि रेकॉर्ड सुधा करता आला. खास माझ्या वाचकांसाठी व्हिडीओ शेअर करत आहे.


हे दोन्ही व्हिडीओ नक्की बघा.
दर्शन झाल्यावर विजय ने घरून आणलेली ईडली आणि सांभारावर ताव मारला.
वातावरणात असलेला गारवा आणि तिथला निसर्ग सोडून आम्हाला पुन्हा खाली यायची इच्छा होत नव्हती पण काय करणार.. ये जालीम भुख ... आणि रविवार होता..  :D लवकर निघायचे होते.. कारण पुढचा प्लान होता कल्याण च्या बाहेर असलेल्या नार्याच्या धाभ्यावर मिळणारी चिकन हंडी आणि गरमगरम भाकरी...


म्हणून भर पावसात बाईक वरून धमाल करत बापगाव गाठले.. आणि मग काय.... आम्ही दोघे आणि चिकन हंडी...

तोंडाला पाणी सुटले ना??

दिन्डीगड ला कसे जायचे?

ठाण्यावरून येणार असाल तर मुंबई नाशिक हायवे वरून भिवंडीला वळणे तिथून थोडेच पुढे सोनाळे गावात रस्ता जातो. कोणीही दिंडीगड मंदिराचा पत्ता सांगेल.
पावसाळ्यात जात असाल तर सांभाळून राहा कारण जंगल असल्यामुळे साप असू शकतात.

ब्लॉग आवडल्यास नक्की कमेंट करा.