नमस्कार..
१५ डिसेंबर २०१५ रोजी मी SR Motors उल्हासनगर येथून नवी कोरी क्लासिक ३५० सीसी बुलेट विकत घेतली होती तेव्हा कळाले कि SR Motors bullet rides पण काढतात. पण मला जायचा योग येत नव्हता, शेवटी तिथेच काम करणारे श्री सुहास मोरे यांनी मला पालघर राईड बद्दल सांगितले तसेच SR Motors च्या group मध्ये add केले. जवळ जवळ ३० जणांनी confirmation दिले.
ठरल्याप्रमाणे पहाटे ५.४५ ला showroom च्या बाहेर भेटायचे ठरले. एकेक करून सर्वजण जमले. काही वेळात ठाणे घोडबंदर मार्गे पालघर ला जायला आम्ही निघालो.
माझी हि पहिलीच बुलेट राईड. सुरुवात चांगली झाली. रोहित प्रत्येकाला गाडीचे पेपर जवळ असण्याच्या सूचना देत होता.
एका मागे एक येणाऱ्या बुलेट पाहून लोकं आमच्याकडे पाहत होती. कुठेतरी मला सुद्धा जाणवले कि काही काळापूर्वी मी पण त्यांच्यातलाच एक होतो. असा ग्रुप जाताना पहिला कि वाटायचे मला सुद्धा जायला आवडेल पण गाडी नव्हती....
पुढे घोडबंदर रोड वर उतरून rout set केला. आतिश ने सर्वांना राईड instructions दिल्या.
काहीवेळ तिथे थांबून फोटो काढले, सकाळचे फ्रेश वातावरण आणि बुलेट राईड... क्या combination..
मज्जा आली. पुढचा आमचा स्टोप होता हॉटेल फौंटन, ठाणे.
हॉटेल ऐन मोक्याच्या जागेवर होते. फटाफट सर्वांनी नाष्टा ओर्डर केला. अर्धातास थांबून आम्ही सर्व निघालो. एका सरळ रेषेत उभ्या बुलेट पाहून लोकांच्या नजरा गाड्यांकडे वळल्या आणि त्यांना पण आमच्या गाड्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
थोडावेळ फोटो काढून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
या राईड मध्ये मला सर्वात जास्त आवडले ती शिस्त.. येणारा प्रत्येकजण हा राईडर होता तरी सुद्धा सरळ एका लाईनीत गाडी चालवत होते. त्यात ३ लीड होते एक सर्वात पुढे एक मध्ये आणि एक शेवटी...
रोड मस्तच होता.. एकदम सुस्साट तरी सुद्धा सर्वजण जवळजवळ एकाच स्पीड मध्ये गाडी चालवत होते. राईड चे आणखी एक गोष्ट मी mark केली ती म्हणजे भले उजाडले असेल तरीसुद्धा सर्वांचे headlamp चालू होते. त्यामागे सुद्धा एक कारण आहे ते म्हणजे मागून येणारा आपला राईडर mirror मध्ये दिसला पाहिजे आणि group member सहजासहजी ओळखता येतो.
एकमेकांचे cooperation and support was mind-blowing.
एक एक तासांचे break घेत आम्ही पालघर ला चाललो होतो. मधेच वळणदार रोड तर मधेच सरळ रस्ता येत होता. प्रत्येक वळणावर एक नवीन अनुभव येत होता. मधेच एक घाट लागला तो उतरलो कि आपण सफाळे ला निघतो.
पुढे केळवे रोड रेल्वे स्टेशन लागले. बाजूच्या रोड ने सरळ गावातून केळवे बिच वर जायचा रोड आहे. गावातून जाताना जुने दिवस आठवले जेव्हा मामा/माउशीच्या घरी जायचो.
आणि शेवटी आम्ही destination गाठले. सकाळचे १० वाजले होते. मस्त सोसाट्याचा वारा पण सुटला होता त्यामुळे लांबच्या प्रवासाचा थकवा बिल्कुल जाणवला नाही.
भरपूर फोटो काढले नंतर बिचवर फिरून परतीच्या प्रवासाला निघालो. मधेच एका छान रेसोर्टमध्ये जेवायला उतरलो.
जेवतानाच अतिश आणि सुरेश राव यांनी पुढची ट्रीप फायनल केली. ३ दिवस तारकर्ली, कोकण १००० किमी राईड. इथे जायचा मी १००% प्रयत्न करणार. :) :)
जेवून दुपारी ३.३० ला आम्ही निघालो आणि direct फौंटन हॉटेललाच भेटायचे ठरले. रस्ता जवळजवळ माहितीच होता म्हणून प्रत्येकजण सुसाट पण शिस्तीत जात होता.
संध्याकाळी ६ वाजता हॉटेलमध्ये चहा/ कॉफी घेऊन सगळ्यांना हाय बाय करत परतीच्या प्रवासाला निघालो.
तुम्ही इंटरेस्टेड आहात बुलेट राईडसाठी? मग SR Motors उल्हासनगर ला भेट द्या तिथे अतिश (Manager) किंवा सुहास मोरे भेटतील.
नोट:
1.राईडला जाताना शक्यतो riding (safety) jacket, gloves, knee guards and sunglasses असणे केव्हा हि योग्य आणि Helmet is MUST.
2. आगाऊ riders ला इथे पुन्हा बोलावले जात नाही. :)
ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की कळवा.
धन्यवाद,
निशांत पोतदार
www.fb.com/nishantpotdar
Instagram: @thenishantpotdar
पाऊलवाटा पेज लाईक करायला विसरू नका: www.fb.com/paaulwata
No comments:
Post a Comment