८ फेब्रुवारी २०१४
“अकाल मृत्यू वोह मरे जो काम करे चांडाल का..
काल उसका क्या करे
जो भक्त हो महाकाल का...!!”
आयुष्यात पहिल्यांदाच इंदौरला जाण्याचा योग आला.
इंदौर बद्दल खूप ऐकून होतो, पण आज लग्नाला गेलो तेव्हा कळाले. मध्यप्रदेशातील
इंदौर हे एक नावाजलेले शहर. मुंबई सेन्ट्रल ला जेव्हा अवंतिका एक्सप्रेस मध्ये
जेव्हा बसलो तेव्हा इतकेचमाहीत होते की मेहुणीच्या लग्नाला जायचे आहे आणि दुसर्या दिवशी
परतायचे आहे. ७ तारखेला रात्री लग्न झाले, त्याच वेळेस सासरकडच्या नातेवाईकांशी
गप्पा मारताना जवळपासची माहिती विचारली, त्यावर माझे एकट्याचेच उज्जैनला जायचे ठरले.बाकीच्यांचे
हो नाही असेच होते. पण शेवटी सगळे एकमत झाले आणि ८ तारखेला बायको, मेहुणा आणि सासू
सासरे आम्ही यजमानांचा निरोप घेऊन उज्जैन ला जायला निघालो.
रिक्षा करून जवळच्या एका गेस्टहाउस वर उतरून अंघोळी
उरकल्या, मधल्या वेळेत हॉटेल मालकाला जवळ बघण्यासारखे काय आहे असे विचारले असता
एकदम नम्रतेने त्याने सांगीतलेकीजवळच२ मिनिटांवर श्री महाकालेश्वराचे मंदिर आहे आणि
आजूबाजूला आणखी काही बघण्यासारखी मंदिरे आहेत.
1.
महाकालेश्वर मंदिर
2.
श्री बडे गणेशजी मंदिर
3.
मां हरसिद्धीमाता मंदिर
4.
राम मंदिर
5.
श्री राम घाट (शिप्रा नदी)
6.
श्री राजा विक्रमादित्य
7.
श्रीमंगलनाथ मंदिर
8.
सिद्धवट मंदिर
9.
श्रीकालभैरव मंदिर
10.
श्रीगढकालिका मंदिर
11.
श्रीभृर्थहारी गुंफा
12.
श्री संदीपनी आश्रम
वरील पैकी ६ मंदिरे
जवळपासच आहेत. पूर्ण १२ मंदिरे पाहण्यासाठी महाकालेश्वर मंदिराच्या बाहेर ओम्नी
कार असतात. ड्रायवरच गाईडचे काम करतात. प्रत्येकीरुपये १००/- घेऊन सर्व मंदिरे
फिरवून आणतात. (नोट: ड्रायवरचामोबाइल नंबर पुढे देत आहेच, त्यामुळे जास्त विचार
करू नका.)
महाकालेश्वर मंदिर:
लगेच कार मध्ये बसून
आमचा पुढचा प्रवास सुरु झाला....
मंदिराच्या
परिसरातून बाहेर आलो आणि पहिले मंदिर लागले ते बडा गणेशजी.. खूप मोठी गणेशची
मूर्ती बघून मला आपल्या मुंबईतील गणेशोत्सवाची आठवण झाली. त्याच मंदिरात गाईची
मूर्ती,पंचमुखी मारुती आणि इतर देऊळे आहेत.
गणपतीचे दर्शन घेऊन
लगेचच आम्ही राजा विक्रमादित्य मंदिरात गेलो. गाईड च्या सांगण्यांनुसार,
राजाविक्रमादित्यचे सिंहासन आकाशात उडून गेले. राजाच्या दरबारात जाण्यापूर्वी खाली
काळ भैरवाचे छोटे मंदिर लागते. दर्शन घेऊन वर गेलो आणि महाकाली तसेच राजाचा दरबार
बघितला.
लगेच राजा
विक्रमादित्यची कुलस्वामिनीहरसिद्धी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिर खूप
जुने व कोरीव आहे. गाभार्यात वरती देवदेवतांची चित्रे आहेत. त्यामागे काही कथा
असतीलच पण वेळ नसल्यामुळे जास्त माहिती घेता आली नाही.
थोडं पुढे गेल्यावर
शिप्रा नदी तसेच राम घाट लागतो, याच ठिकाणी कुंभमेळा भरतो. २०१६ साली याच
ठिकाणीकुंभमेळा असल्यामुळे जागोजागी तयारी चालू असलेली दिसली. त्याच पुलावर थोडं
पुढे गेल्यावर एक स्मशान दिसले, असे म्हणतात याच स्मशानातून ताजी राख
महाकालेश्वाराला लावली जात असे.
श्रीभृर्थहारी गुंफा:
हि गुंफा काही किलोमीटर दूर शहराच्या बाहेर आहे.श्रीभृर्थहारी
संन्यासाचीहि गुंफा होती. जवळजवळ ४ फुट उंचीच्या दरवाज्यातून आत जावे लागते. ज्या
व्यक्तींना हायब्लडप्रेशरचा त्रास असेल त्यांनी न जाणेच योग्य कारण आत ऑक्सिजन कमी
आहे तरी आत रिस्क घेऊन गेलो. दुसऱ्या गुंफेत चारधाम ला जाणारा भुयारी मार्ग आहे. असे
म्हणतात या मार्गाचे दर्शनानेच चारधाम यात्रेचे पुण्य मिळते. जोडीने पुण्य परत
खिशात टाकून बाहेर येऊन मोकळा श्वास घेतला.
श्रीगढकालिका मंदिर:
अतिप्राचीन असे कालिका देवीचे मंदिर आहे. देवीचे
दर्शन घेऊन निघालो. तुम्हाला वेळ असेल तर श्रीस्थिर मन गणेश मंदिराला नक्की भेट द्या.
श्री काळ भैरव मंदिर:
तेव्हा गाईड कडून
अशी माहिती मिळाली की श्री कालभैरव दारू पितो.
पहिले तर विश्वासच
बसला नव्हता. पण प्रत्यक्षात लोकांना देवाला दारू पाजताना आणि देव दारू पिताना
पहिले. जसे आपण बशीने चहा पितो तसेच देव चांदीच्या बशीने दारू पीत होता. असे
म्हणतात की दारू मंदिराच्या बाहेर कुठेच जात नाही, नमंदिराच्या खाली. काही
वर्षांपूर्वी इंदिरा गांधीने मंदिराच्या आवारात खोदून पहिले होते पण सर्व निष्फळ ठरले.
चमत्कार पाहण्यासाठी
या मंदिराला नक्की भेट द्या.
दर्शनघेऊन आम्ही
मंगलनाथच्या दर्शनाला निघालो.वृशिक राशीस्वामी मंगळ येथे पिंडीच्या स्वरुपात
विराजमान आहे. माझी रास हीच असल्याने मनापासून दर्शन घेतले.
मंदिराच्याबाहेरमंगळाची आई श्री भुवनेश्वरी मातेचे (पृथ्वी) मंदिर आहे.
वेळे अभावी थोडीच
ठिकाणे फिरू शकलो तरी संदीपनी आश्रम राहिलाच, कारण५.४५ ची अवंतिका एक्सप्रेस मुंबईचे रीसर्वेशन
होते.
गाईड/ड्रायवर ने
उज्जैन स्टेशनाच्या बाहेर सोडले, तेथेच एका हॉटेलात आम्ही जेवलो आणि स्टेशन वर
दिवसभराच्या आठवणी सोबत घेऊन गाडीची वाट पाहत थांबलो.
Name and no. of driver |
कसं जायचं उज्जैनला?
मुंबईहून जाणार असाल
तर मुंबई सेन्ट्रल वरून अवंतिका एक्स्प्रेस आहे. संध्याकाळी ७.०५ वाजता.
इंदौर वरून बस ने
माणसी ५३/- तिकीट आहे. उज्जैन वरून जर जाणार असाल तर बाहेंच रिक्शा असतात. बस असेल
पण नक्की वेळ माहीत नाही.
नोट: उज्जैनला जाणार
असाल तर चांगली २-३ दिवसांची सुट्टी काढून जा तरच सर्व उज्जैन घाई न करता फिरून
होईल. तसेच काही किलोमीटरवर ओंकारेश्वर आहे. संपूर्ण package रु.२७००/- मध्ये
उज्जैनचे ड्रायवर फिरवून आणतील.
माझा लेख कसा वाटला?
कमेंट मध्ये नक्की सांगा.
धन्यवाद..
निशांत पोतदार