आज बऱ्याच दिवसांनंतर काहीतरी घेऊन येतोय....
असेच एकदा विचार करत होतो, कि जिथे मी राहतो तिथल्या लोकांसोबत एकदा बाईक राईड करायची.
दिवस पण थंडीचे आहेत आणि याच दिवसात सकाळीच बाईक रपेट मारायला मज्जा येईल.
बिल्डिंगच्या ग्रुप वर टाकले आणि काही जण यायला तय्यार पण झाले.
दिवस ठरला, सकाळी ६ वाजता बायकर्सना माळशेज घाट मार्गाच्या आणि इतर सूचना देऊन आम्ही निघालो.
पहाटेची बोचरी थंड हवा आणि समोर दिसणारा मोकळा रस्ता आम्हाला माळशेज घाटात जायचा उत्साह देत होता.
सकाळच्या वेळेस आणि रस्ता सामसूम असल्यावर बुलेट चालवायची मज्जा काही औरच!

थोडे फोटो सेशन करून आम्ही पुढे निघालो. निघतानाच ठरवून निघालेलो कि २ तासात माळशेज घाटात पोहोचायचेच पण काही तांत्रिक अडचणींमुळे जमले नाही.

जस जसे पुढे जात होतो तसा वळणदार आणि दोन्ही बाजूनी झाडी असलेला रोड लागत होता. मधेच एखादे खेडेगाव लागायचे. तिथे खेळणारी लहान मुले पाहून मला माझे बालपण आठवले. जेव्हा मामाच्या गावाला जायचो अशीच मस्ती करायचो मित्रांसोबत.
आणि शेवटी घाटाच्या पायथ्याशी आलो. तिथेच ठरवले कि कोणालाच मागे ठेवायचे नाही आणि कोणीही जास्त पुढे जायचे नाही कारण "अति घाई ; संकटात नेई!" 😀😀
येणाऱ्या प्रत्येक स्पॉटवर आम्ही फोटो काढत चाललो होतो. आमचे शेवटचे ठिकाण होते MTDC रेसोर्ट, माळशेज घाट.
आणि शेवटी आम्ही माळशेज घाट MTDC रेसोर्ट ला पोहोचलो.
येताना आम्ही टीटवाळा जवळ एका धाब्यावर जेवलो आणि संध्याकाळीअंदाजे ५ वाजता परत घरी पोहोचलो.
माळशेज घाटात जायचा रोड एकदम सरळ आहे. कल्याणवरून जाणार असाल तर शहाड मार्गे जावे.
कल्याण ते माळशेज घाट हे अंतर १०० किलो मीटर आहे.
खाली फोटो ची लिंक देत आहे.
Malshej Ghat Ride
ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि माझ्या YouTube channel ला subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद,
निशांत पोतदार
YouTube: पाउलवाटा
Facebook: https://www.facebook.com/paaulwata/