खिडकाळेश्वर मंदिर आणि मुंब्रा देवी (१५.०५.२०११)
नेहेमी प्रमाणे प्रीप्लान करून आम्ही कल्याणवरून मुंब्रादेवीला जायचे ठरवले. विजय आणि मी माझ्या बाईकवरून निघालो. वाटेत खिडकाळेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन पुढे जायचे असे ठरवले त्याप्रमाणे आम्ही मंदिरात उतरलो. महादेवाचे मंदिर प्राचीन आहे. येथे अनेक भाविक विधी करण्यास येतात.
अर्धा ते पाऊन तासाने आम्ही वरती पोहोचलो. साधेच खडकात कोरलेले मंदिर आहे, पण आता मंदिराचे काम चालू आहे. पूर्वी या ठिकाणी माकडे होती पण आता नसावीत. वरती मंदिरात खूप वारा सुटला होता.
देवीची आरती आटपून आम्ही उतरू लागलो. बऱ्याच महिन्यानंतर डोंगर चढल्याने दोघांचे हि पाय दुखू लागले होते. हा हा हा...!
बरेच भाविक आणि ट्रेकर मंडळी आम्ही उतरताना भेटली.
खाली उतरून बाईक काढली आणि घरी निघालो.
मुंब्रादेवीला जायचा मार्ग:
१. तुम्ही मुंबई वरून येणार असाल तर सेंट्रल रेल्वेच्या मुंब्रा स्टेशनवर उतरणे. (स्लो ट्रेन पकडणे). कोणालाही विचारले तरी मंदिराचा मार्ग सांगतील.
२. तुम्ही कल्याण,पनवेल,वाशी वरून येणार असाल तर बस आहेत. कल्याण फाट्यावर किंवा शीळफाट्यावर उतरून रिक्षेने मुंब्र्याला येणे. बाईक ने येणार असाल तर शीळ फाट्यावरून येणे. मुंब्र्याला नवीनच बायपास हायवे झाला आहे, त्याने आलात तर मंदिराच्या पायथ्याशीच याल. पर्सनल वेहीकॅल असेल तर चांगलेच आहे, आसपास २ ते ३ ठिकाणी पिकनिक स्पॉट आहेत ते देखील तुम्ही करू शकता. शीळफाट्यावर दत्त मंदिर आहे, खूप शांत आणि सुंदर मंदिर आहे. या ठिकाणी नक्की भेट द्या. थोडे ४ ते ५ किलोमीटर कल्याणच्या दिशेने याल तर खिडकाळेश्वर महादेवाचे मंदिर आहे याच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच वाशीच्या दिशेने डोंगरून रस्ता आहे इथे उंचावर गणपतीचे मंदिर आहे तसेच खारीवली देवीचे मंदिर जवळच आहे.
मुंब्रादेवीला जायचा खर्च: अंदाजे रुपये ५०/-ते १००/- प्रत्येकी.
धन्यवाद!
निशांत पोतदार (nishantpotdar@gmail.com) Mobile: 9619251007
आमचा पाउलवाटा ग्रुप जॉईन करण्यासाठी Facebookवर “पाउलवाटा” शोधणे आणि add करणे.
https://www.fb.com/paaulwata
No comments:
Post a Comment