१६ मे २०१८
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,
आज नुकताच आलेला अनुभव शेअर करत आहे.
![]() |
Image courtesy: गुगल्या भाऊ |
आपल्यापैकी बरेच जण दररोज घर ते ऑफिस दुचाकी किंवा चार चाकीवरून प्रवास करत असतात आणि
सध्या उन्हाळा असल्यामुळे बरेच दा टायरचे प्रेशर कमी होते आणि हिवाळ्यात वाढते. कधी कधी आपण रस्त्याजवळ हायवेला लागून असलेल्या छोट्या ग्यरेज मध्ये हवा भरून घेण्यासाठी थांबतो आणि त्याच वेळेस आपल्याला सांगितले जाते कि टायर पंक्चर आहे.
मी दररोज गेली ४ वर्ष बुलेटने ऑफिसला जातो आणि नेहेमीच हायवे वर हवा भरून घेतो. काही दिवसांपूर्वी मी नेहेमीप्रमाणे हायवे वर हवा भरून घेतली आणि अचानक मेकॅनिक ने सांगितले पुढच्या टायर मध्ये हवा कमी आहे, खूपच उन होत आणि मला ऑफिसला जायला उशीर होत होता, त्यात त्याच्यात थोडा कॉन्फिडन्स कमी वाटला म्हणून त्याला नाकारून मी पुढे निघालो. ऑफिस सुटल्यावर पुन्हा टायर दाबून पहिला असता हवा जरासुद्धा कमी नव्हती, त्यानंतर मी जव्हारची सोलो राईड पण मारली.
पुन्हा गेल्या सोमवारी हवा भरायला हायवेला दुसऱ्या गरेज मध्ये थांबलो असता त्याने सुद्धा मला हेच सांगितले कि पुढच्या टायर मध्ये हवा भरून काही फायदा नाही, टायर पंक्चर आहे. बाकी यावेळेस मला थोडे खरे वाटले कारण राईड मारून आल्यामुळे कदाचित कुठेतरी गाडी पंक्चर झाली असावी.
माकॅनिक ने मला टायर दाबून दाखवून पटवून देण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि मी तयार झालो. यावेळेस सुद्धा टायर बदलायला वेळ लागेल म्हणून मी निघालो.
गाडीचे RSA (Road Side Assistance) असल्याने ऑफिस ला येऊन माकॅनिक ला बोलावून घेतले. त्याने चेक करून सांगितले कि टायर बिलकुल पंक्चर नाही आहे.
मंडळी , सांगायचा हेतू हाच कि ज्यावेळेस तुम्ही हवा भरायला कुठे थांबता तर लगेच कुणावर विश्वास ठेऊ नका. सध्या प्रत्येक जण कमी मेहनत घेऊन श्रीमंत व्हयला बघतोय जे साफ चुकीचे आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा अश्या ट्रापमध्ये सापडू नये हीच इच्छा.
धन्यवाद,
निशांत पोतदार
ब्लॉगपोस्ट कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग शेअर करा.
आपले फेसबुक पेजलाईक करायला विसरू नका: https://www.facebook.com/paaulwata
YouTube वर पण Subscribe करा: https://www.youtube.com/channel/UC3GalhgUi_5i_bWBFj7odzA