Translate this blog

banner

Tuesday, January 22, 2019

शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, कल्याण पश्चिम



नमस्कार मंडळी!
जय जिजाऊ जय शिवराय!

चार दिवसांपूर्वी राघवला बुलेटवरून कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात फेरफटका मारत होतो तेव्हा अचानक एका नुकत्याच बनलेल्या पण अर्धवट काम असलेल्या शॉपिंग मॉल कडे माझे लक्ष वळले आणि लक्ष वळण्याचे कारण होते शिवरायांचा सहा फुटी पुतळा.
सुरवातीला नीट काही समझले नाही पण आत कसले तरी प्रदर्शन असणार असे वाटलं होत म्हणून संध्याकाळी मी, माझी पत्नी आणि राघवला घेऊन तिथे जायचे ठरवले.

बाहेरच मंडपात शिवरायांचे आणि संभाजी महाराजांचे फोटो फ्रेम्स विक्रीसाठी उपलब्ध होते.

तिकीटे काढून आत प्रवेश केला आणि समोरच महाराजांची भव्य मूर्ती नजरेस पडली.  शिवरायांना वंदन करून आम्ही आत गेलो.
आत गेल्या गेल्या डाव्या बाजूला कल्याणमधील कलाकारांनी साकारलेल्या ऐतेहासिक सुंदर रांगोळ्या पहावयास मिळाल्या.




 









अनेक लहान थोर सर्व जण उत्सुकतेने ते प्रदर्शन पहावयास आले होते. वयस्कर लोक इतिहास मनातच आठवत होते आणि लहान मुले इतिहास समझून घेत घेत होते.
त्या अप्रतिम रांगोळ्या पाहताना सर्वांना फोटो काढण्याचा मोह होत होता. प्रदर्शन पाहण्यासठी अक्षरशः गर्दी लोटली होती, पण सर्वजण शिस्तीत रांगेत पुढे सरकत होते.

पुढे लागले ते गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने प्रशांसलेले, लिमका बुकने नोंद घेतलेले, प्रत्येकाला बालपणात घेऊन जाणारे आवर्जून पाहावे असे तांबे पितळेच्या १५०० भांड्यांचे सांस्कृतिक प्रदर्शन "आजीची भातुकली "
(आजीच्या भातुकलीचा व्हिडीओ तुम्हाला खालील युट्यूब व्हिडीओ मध्ये पाहण्यास मिळेल.)
आजीच्या भातुकलीचे संग्राहक आहेत श्री विलास नारायण करंदीकर (०२०-२४४८०२७९)

भातुकलीचा संग्रह पाहून झाल्यावर लगेच शस्त्रांचे प्रदर्शनाकडे आम्ही वळलो. सर्व प्रकारच्या तालवारी, भाले, तोफ गोळे सर्व प्रकारच्या हत्यारांची संपूर्ण माहिती तिथे देण्यात आली होती. प्रदर्शन पाहताना प्रत्येकाला नक्कीच आपल्या इतिहासाचा अभिमान वाटला असणार.
त्यापुढे होते शिवाजी महाराजांच्या काळातील गड कोटांच्या फोटोस आणि स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या अनेक वीरांच्या वंशावालीचे प्रदर्शन.
प्रदर्शन पाहताना खरच अभिमानाने छाती भरून यायची...

प्रदर्शनात एक गोष्ट नक्कीच नाही आवडली ती म्हणजे तिथे प्रदर्शन पाहण्यास येणाऱ्या तरुण तरुणींची...

बाहेरील मंडपात असलेल्या महाराजांच्या मूर्तीसोबत फोटो काढताना तरूणांना आणि तरुणींना याचे सुद्धा भान नव्हते कि ते ज्यांच्या सोबत फोटो काढत आहेत ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हजारो कोटी लोकांचे प्रेरणास्थान आहेत. आज ज्यांच्यामुळे आपण आहोत असे थोर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्यासोबत उभे राहताना बिनधास्तपणे पायात चप्पल, शूज घालून उभे होते. हे पाहताना खुप वाईट वाटत होते. शेवटी न राहून एका ग्रुप ला मी पकडलेच आणि नीट समजावून सांगितले, त्यावर त्यांनी त्यांची चुकी कबुल केली.

मला तरूणांना हेच सांगायचे आहे कि आपल्या संस्कृतीचा, आपल्या इतिहासाचा आदर आपणच नाही केला तर दुसऱ्या कोणी अपमान केल्यास आपल्याला त्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही. याचे भान असावे.

धन्यवाद..!

आजच्या व्ही-ब्लॉगच्या काळात सुद्धा माझा ब्लॉग वाचणाऱ्या समस्त वाचकांना धन्यवाद.

पाऊलवाटा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा आणि पाऊलवाटा YouTube channel नक्की सबस्क्राईब करा.


Follow us:
Paulwata facebook page: https://www.facebook.com/paaulwata/
Instagram: https://www.instagram.com/paulwata/
Twitter: https://twitter.com/paaulwata





No comments:

Post a Comment