Translate this blog

banner

Wednesday, January 12, 2011

मानस मंदिर शहापूर, पांडव लेणी

रविवार ९ जानेवारी २०११ ला आमचे फिरायला जायचे ठरले आणि आम्ही स्पॉट निवडला कल्याण जवळ असणारी पांडव लेणी, मानस मंदिर, शहापूर आणि  पडघा-शहापूर हायवेवर असणारे माता वैष्णो देवी मंदिर आणि अमरनाथ गुंफा.
सकाळीच बाईक वरून निघालो आणि गाठले ते  पडघा-शहापूर हायवेवर असणारे माता वैष्णो देवी मंदिर.
कल्याण पासून अंदाजे २५ किलोमीटर वर हे मंदिर आहे.
मंदिर नवीनच आहे अंदाजे ४-५ वर्षांपूर्वी मंदिराची उभारणी झाली असावी.
मंदिरात माता वैष्णोदेवी, नवदुर्गा मंदिर, हनुमान मंदिर, अमरनाथ गुंफा असून मंदिराच्या बाहेर थोडे लांब बाबा भैरवनाथ मंदिर आहे.
फोटोत दिल्याप्रमाणे दर्शन घ्यावे असे म्हणतात.



















मंदिरात पहिले दर्शन घेतले ते साई बाबांचे (गुरु साई धाम). सकाळ असल्यामुळे दर्शन घेतल्यावर मन खूप प्रसन्न झाले.
                                                                      (गुरु साई धाम)
दुसरे दर्शन झाले ते श्री हनुमंताचे. मूर्ती खूप प्रसन्न वाटत होती.
















नंतर आली ती अर्ध क्वरीची गुंफा. या गुंफेतून वर जायचे असते.
अर्ध क्वारी गुंफा 

वर गेलो कि लागते ते नवदुर्गा मंदिर. मंदिरातील आईची मूर्ती खुपच लोभनीय वाटते.




दर्शन घेऊन आम्ही पुढच्या मंदिरात गेलो.

मंदिराच्या हॉल मध्ये लिहिलेले सर्व मंत्र वाचून आम्ही पुढे निघालो.


पुढे गेलो आणि लागले ते माता वैष्णो देवी मंदिर. या मंदिरात जाण्यासाठी सुद्धा छोट्या गुहेतून जावे लागते.

आत गेले असता दर्शन होते ते देवीचे.


मंदिरातून  बाहेर पडल्यावर दर्शन घेतले ते बाबा अमरनाथ चे




शेवटी भैरव नाथाचे दर्शन घेऊन बाईकला किक मारून आम्ही निघालो ते मानस मंदिर,शहापूरला.
आमचा पुढचा स्टोप होता मानस मंदिर, शहापूर. कल्याण पासून अंदाजे ३५ किलो मीटर दूर. मुळात मानस मंदिरम हे जैन मंदिर आहे. हे मंदिर सध्या अर्धावस्थेत आहे.
पूर्ण पणे मार्बल मध्ये बनवलेले हे मंदिर आपले लक्ष वेधून घेते.

 

मानस मंदिरम् मध्ये श्री क्षेत्रपाल मंदिर आहे. ह्या मंदिराच्या मागे वडाचे झाड असून त्यावर एक नाग आहे, ज्याला हा नाग दिसतो तो नशीबवान असे म्हणतात, आणि आम्ही नशीबवान ठरलो. नागाच्या दर्शनाचा योग मला आला.




श्री क्षेत्रपाल मंदिर.

नीट पहिले असता तुम्हाला सुद्धा दर्शन मिळेल. दर्शन घेऊन आम्ही निघालो ते थेट पांडव लेणींच्या दिशेने. मानस मंदिरम् सोडताना दुरून दर्शन झाले ते माहुली किल्ल्याचे.
किल्ले माहुली

पांडव लेणी हि कल्याण पासून १० किलो मीटरवर आहेत. आणि शहापूर वरून अंदाजे २५ किलोमीटर.




मानस मंदिर शहापूर, पांडव लेणी



कल्याणवरून जाताना प्रायवेट वेहीकॅल असणे गरजेचे. कल्याणच्या आधारवाडी चौकातून सरळ गांधारी पुलावरून जाणे अंदाजे ९ किलोमीटरवर पहिले पांडव लेणी लागतील. त्याच हायवेने पुढे गेले असता पडघा-शहापूर हायवे लागेल त्याने सरळ गेले असता वैष्णो देवी मंदिर लागेल. त्याच रस्त्याने पुढे गेले असता ६ किलोमीटर वर मानस मंदिरम्.
मानस मंदिरम् ला जाण्यासाठी रेल्वे पण उत्तम मार्ग आहे. आसनगाव ला उतरून ऑटो ने जाणे.




View Larger Map

तुम्हाला माहिती कशी वाटली ते नक्की कळवा. माझा मेल आयडी :nishantpotdar@gmail.com

1 comment:


Powered byEMF Online Form
Report Abuse