किल्ले लोहगड |
१२ डिसेंबर २०१० रोजी आम्ही ठरवले ते जायचे लोहगड आणि विसापुरला आणि तसे प्लानिंग केले.
मी निघालो कल्याणवरून, विजय निघाला खोपोली वरून आणि रवी पुण्यावरून.
कल्याण वरून जाताना मी सकाळी ६.४० च्या इंद्रायणी एक्सप्रेसने निघालो. जाताना मस्त कर्जतची कांदा भाजी खाऊन मी पुढे निघालो. pre-planning केल्यामुळे आमचे लोणावळ्याला भेटणे ठरले.
लोणावळ्याला लगेच पुण्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसून आम्ही निघालो, लगेच पुढचे स्टेशन होते मालवली.
किल्ले विसापूर |
मळवली वरून दोन ते तीन किलोमीटर पुढे चालत जाऊन लागले ते भाजे लेणी, भाजे लेणी पूर्वी केल्यामुळे आम्ही फक्त लोहगड आणि विसापूर करणेच ठरवले.
मळवली वरून लोहगड अंदाजे ५ किलोमीटर आहे. वर चढताना पहिले दर्शन झाले ते विसापूर किल्ल्याचे.
लोहगडाचा नकाशा |
मजा करत करत आम्ही आलो ते लोहगडाच्या पायथ्याशी.
किल्ले लोहगडाची माहिती:
किल्ले लोहगड हा अति मजबूत बुलंद असा दुर्ग आहे. लोह्गडाची रचना होऊन फार वर्षे झाली. तो बहुदा सातवाहन कालीन म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वीचा असावा. गडाची बांधणी अतिशय भक्कम आहे.तटबंदी व बुरुज इतिहासाची साक्ष देतात. गडावर पाच दरवाजे आहेत. त्यात प्रामुख्याने गणेश दरवाजा, महा दरवाजा, नाना दरवाजा, त्र्यंबकेश्वर दरवाजा व हनुमान दरवाजा येतात. गडाचा इतिहास पहिला तर प्रथम सातवाहन, पुढे बहुमानी नंतर इतिहास कालीन नोंदी प्रमाणे १४९१ मध्ये निजामशाहीचा संस्थापक मलिक अंबर ने किल्ला घेतला.१६३७ मध्ये आदिलशहा कडे,१६४७ च्या दरम्यान शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात घेतला. मिर्झा राजेंच्या बरोबर केलेल्या तहात हा किल्ला मोगलांकडे होता. आंग्रे यांनी पुन्हा तो स्वराज्यात आणला.१७६१ साली निजामाने येथून मोठ्याप्रमाणावर संपत्ती लुटून नेली.१८९८ मध्ये इंग्रजांनी एकही गोळी न झाडता हा किल्ला ताब्यात घेतला.
पावणा तलाव |
आणि आम्ही किल्ल्यावर चढाई सुरु केली. रुंद पायरया चढत आम्ही वर चाललो होतो.
अर्धा किल्ला वर चढून गेलो आणि वरून दूर नजर टाकली असता दिसला तो पावणा तलाव.
वर चढताना लागल्या त्या स्वराज्याच्या रक्षणकर्त्या तोफा.
पहिले लागला तो गणेश दरवाजा. या दरवाज्यात पूर्वी शत्रूचे आक्रमण थोपविण्यासाठी खिळ्यांचा दरवाजा होता. पण पडझड झाल्यामुळे काही इतिहास प्रेमी मंडळांनी पुन्हा नव्याने या दरवाज्याची उभारणी केली.
लोहगडावर बुरुजांमध्ये छोट्या फटी तयार केल्या होत्या, त्यांचा वापर शत्रूंवर गोळ्यांचा मारा आणि उकळते तेल ओतण्यासाठी केला जात असावा.
थोडे वर चढून गेलो आणि जाऊन पोहोचलो ते महादरवाज्यात.
महादरवाजा |
महा दरवाज्यातील बुरुज |
महादरवाज्यातून मागे बघितले असता देखणा बुरुज दिसतो. तो बघून मला सुद्धा त्याचा फोटो घेण्याचा मोह झाला. पुढे गेल्यावर लागतो तो हनुमान दरवाजा.
सर्व दरवाजे पार करत शेवटी आम्ही गडावर पोहोचलो. किल्ला ओसाड जरी वाटत असला तरी त्यावर लहान मोठी पाण्याची डबकी, मंदिर, आणि तोफा आहेत.
त्याच पैकी एक तोफ मला दिसली. हिवाळा असल्यामुळे कितीही फिरलो तरी थकवा येत नव्हता. आम्ही तिघांनीही खूप एन्जोय केला हा ट्रेक.
खूप फिरून झाल्यावर आम्ही पोहोचलो ते विन्चु काट्यावर. विंचू काटा हे लोहगडाच्या एका टोकाचे नाव. लांबून पहिले असता हे टोक विंचवाच्या नांगी सारखे दिसते म्हणून याला विंचू काटा असे नाव आहे. विंचू काट्यावर वणवा पेटवलयामुळे मला पुढे जाता नाही आले.
विंचू काटा फिरून आणि आमचे थोडे फोटो शेशन करून आम्ही उतरायला लागलो.
किल्ले विसापूर |
खाली उतरताना लोह्गडा वरून लांबून दिसला तो विसापूर किल्ला. भूक हि मस्त लागली होती म्हणून खाली उतरून पिठले भाकरी आणि मिरचीचा ठेच्यावर मस्त ताव मारला. लोह गडाच्या पायथ्याशीच एका होटेल मध्ये आम्ही जेवलो.
गायमुख खिंड. |
जेवण झाले आणी मर्द मराठे तयार झाले ते किल्ले विसापूर सर् करायला. विसापूर किल्ला सर् करण्यासाठी आम्ही पुन्हा गायमुख खिंडीत आलो. गायमुख खिंड म्हणजे लोहगड आणि विसापूर ला जाणारा मधला रस्ता. एक रस्ता लोह गडाच्या पायथ्याशी जातो तर दुसरा विसापूर किल्ल्यावर जातो. इथल्या स्थानिकांच्
किल्ल्यावर जाण्यासाठी बहुतेक दिशा दर्शक म्हणून दगडात कोरलेली घोड्याची मूर्ती होती. जास्त माहिती न मिळाल्यामुळे या बद्दल मी काही लिहू शकत नाही.
किल्ला चढण्यासाठी आम्हाला बरोब्बर एक तास लागला, आणि शेवटी आम्ही किल्ला सर् केला.
विसापूर गडाचा बुरुज |
किल्ल्यावर पाहण्यासारखे खूप आहे. स्थानिकांच्या मते हा किल्ला पूर्णपणे पाहण्यासाठी एक दिवस लागतो. ह्याचा आकार पण लोहगडाच्या तिप्पट आहे.
किल्ला आता ओसाड जरी असला तरी यावर असणाऱ्या पडक्या वाड्यांमुळे किल्ल्याचा अंदाज येतो. किल्ल्यावर पूर्वीच्या काळातील दगडी धान्य दळायचे जाते, तसेच तेल काढायचे दगडी यंत्र पण आहे.
दगडी जाते |
तेल काढायचे दगडी यंत्र |
या किल्ल्याची बांधणी सुद्धा भक्कम आहे.
वरती हनुमंताचे (दगडात कोरलेले) आणि शंकराचे मंदिर आहे.
View Larger Map
अतिशय सुंदर वर्णन
ReplyDelete