नमस्कार..आज पासून परत नवीन ठिकाणे घेऊन येत आहे.. आजचे ठिकाण आहे शेगाव आणि आनंदसागर ..
अनेक वर्षांपासून गजानन महाराजांच्या दर्शनाला शेगाव ला जायचे असे चालले होते आणि या वर्षी जोडीने जायचा योग आला. कल्याण वरून रात्री 8 वाजता विधर्भ एक्स्प्रेस ने आम्ही निघालो, नागपूरहून कार्यक्रम आटपून अकोला,खामगाव शेगाव असा प्रवास सुरु झाला. शेगाव ला जायचे आनंद सागर पहायचे याची खूप उत्सुकता लागली होती अन माझा कॅमेरा पण तिथले फोटो सेव करायला तय्यार होता. महाराजांबद्दल मी काय सांगणार?आपण जाणतेच आहात तरी मला गुगलवर मिळालेली माहिती शेअर करत आहे.
शेगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.
संत गजानन महाराज |
आनंद सागर, शेगांव |
शेगांव रेल्वे स्थानक मुंबई-भुसावळ-नागपूर मार्गावर आहे.शेगांवाची लोकसंख्या ३२,८२४ आहे.महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातून शेगांवाकरीत राज्य परिवहन मंडळाच्या व खाजगी बसेस उपलब्ध असून मुंबई-नागपूर मार्गावरील सर्व प्रमुख रेल्वे गाड्या येथे थांबतात.
येथील 'कचोरी' हा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे.
आपल्या माहितीसाठी शेगाव येथील गजानन महाराजांचे संकेत स्थळ देत आहे www.gajananmaharaj.org
आनंद सागर हे प्रेक्षणीय स्थळ प्रत्येकाने भेट द्यावी असेच आहे, तरी तुम्ही नक्की जाऊन या..
धन्यवाद..
No comments:
Post a Comment