किल्ले माहुली, शहापुर
15 जुलै 2012किल्ले माहुली |
2815 फुट उंच असा ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंचीचा हा किल्ला ट्रेकिंगसाठी आवडीचे ठिकाण मानले जाते. इतिहासात या किल्ल्याचा उल्हेख आढळतो. छत्रपती शिवरायांचे वडिल श्रीमंत शहाजी राजे भोसले यांच्या ताब्यात हा गड होता.
किल्ल्याचा इतिहास:
8 जानेवारी 1658 साली, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुगलांकडून किल्ला हस्तगत केला. 1661 मध्ये परत करून पुन्हा महाराजांनी किल्ला जिंकला. 1665 साली झालेल्या पुरंदरच्या तहात, मराठ्यांनी हा किल्ला परत गमावला. फेब्रुवारी 1670 मध्ये, शिवाजी महाराजांनी माहुली जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न असफल झाला। मनोहरदास गौड हे त्यावेळेस किल्ल्याचे गडकरी म्हणू काम सांभाळत होते. एक हजार मराठे त्या लढाईत धारतीर्थ पडले.त्यातले बरेचजण माहुलीच्या जवळपासच्या खेडे गावांतील होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मृत सरदार कदम यांस सांगितले होते कि ते आमचे सोन आहेत म्हणून महाराजांनी त्यांच्या कुटुंबाला सोनारे हे उपनाव दिले.
16 जून 1670रोजी, दोन महिन्यांनतर मोरोपंत पिंगळे यांनी किल्ल्यावर विजय मिळवला. आणि माहुली, भंडारगड आणि पळसगड स्वराज्यात आणले.1817 पर्यंत हा किल्ला शिवाजी महाराजांच्या देखरेखी खाली होता पण त्या नंतर त्यावर ब्रिटिशांनी आपला वचक बसवला.
कसे पोहोचायचे :
मुंबई-नाशिक हायवे वर आसनगाव नावाचे एक गाव आहे (मुंबई ते आसनगाव अंदाजे 91 किमी ) आसनगाव जवळच मानस मंदिरम आहे तिथून आत जाणे. अंदाजे 3 किमी आत किल्ल्याचा पायथा आहे.
जर तुम्ही रेल्वे ने जाणार असाल तर मध्यरेल्वेचे आसनगाव स्टेशनवर उतरून आसनगाव पश्चिम वरून रिक्षा किंवा मारुती ओम्नी गाडी मिळते (अंदाजे रु 50 माणशी ) ते थेट गडाच्या पायथ्याशी नेऊन सोडतात.
निसर्गाची मज्जा लुटत जर तुम्ही चालत जाणार असाल तर स्टेशनवरून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचायला अंदाजे 2-अडीच तास लागतात.
खालीच शिव शंकराचे मंदिर लागते, जवळच छोटा ढाबा आहे,तिथे जेवणाची सोय होते. सोबत स्वतः चे जेवण घेऊन गेलात तर उत्तम, अन्यथा नास्ता हाऊस मध्ये जेवणाची सोय होईलच.
हिरवे हिरवे गाल गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमलीवरती,
ती वनराणी खेळत होती|| ' अहाहा..
रान हळद |
किल्ल्यावरच शिव शंकराची पिंड आहे आणि छोटा पाण्याचा टाक पण. तिथूनच थोडे खाली उतरले असता एक दरवाजा लागतो. बहुतेक मुख्य दरवाजा तोच असावा. दरवाज्यातच बाजूला दगडात कोरलेले सिंह आहेत, तसेच बाजूला लेणी आहेत.
खास सांगायचे म्हणजे एक रूल लक्षात ठेवा जेव्हा माहुलीला जाल... Always keep left.
अनेक वाटा आपला मार्ग चुकाविणाऱ्या आहेत. पाऊलवाटे वरून जाताना दुर्गप्रेमींनी बाणाच्या खुणा बनवल्या आहेत त्यांना फोलो करा..
आणखी काही खास गोष्टी नमूद करत आहे: (माझा खास मित्र विशाल याने सांगितलेल्या )
2) जर धावपळीत ओडोमोस घेऊन जायला विसारालातच तर जंगलातील ओळी माती हातापायांना लाऊन चला।, डास चावणार नाहीत.
3)गड चडताना मध्यावर थोडी सरळ चढण आहे.. जीन्स किंवा अंग्सारशी कपडे घालु नये.काही ठिकाणी चढण एका पायाच्या उंची पेक्षा जास्त आहे।
4)सोबत भरपूर पाणी घेऊन जा.गडावरचे पाण्याचे टाके गढूळ बनले आहे.
आणखी सर्वात महत्वाची गोष्ट.... गडावर कोठेही आपले किंवा संघाचे नाव कोरु नका. ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लाऊन स्वराज्य मिळवले आणि टिकवले, त्यांनी स्वतः चे नाव कुठेही लिहिले नाही तर आपण कोण?
ट्रेक ला येणारा अंदाजे खर्च रुपये 250 प्रत्येकी (मध्यम रेल्वे )
आपल्यासाठी रेल्वेचे वेळापत्रक देत आहे:
Asangaon Slow timetable
CST 6.10 am
Dadar 6.28 am
Kurla 6.39 am
Thane 7.05 am
Dombivli 7.27 am
Kalyan 7.36 am
Asangaon 8.14
Kasara slow time table
@ CST 5.03 am
dadar 5.21 am
Kurla 5.32 am
Thane 5.58 am
Kopar 6.17 am
Dombivli 6.20 am
Kalyan 6.28 am
Asangaon 7.05 am
आपला प्रवास सुखाचा होवो.
।।छत्रपती शिवाजी महाराज की जय।।
धन्य ती जिजाऊ । धन्य ते शिवबा।।
धन्यवाद
आपला मित्र
निशांत पोतदार
(BBM :29F1DE99)

चांगली उपयुक्त माहिती , धन्यवाद -सौरभ
ReplyDeleteDhanywad!
Deleteरात्री चढाई करू शकतो का? आता एप्रिल मध्ये
ReplyDeleteहो करू शकता पण सोबत गावातील एक वाटाड्या नक्की घ्या आणि जंगली श्वापदांपासून सांभाळून राहा.
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete