मध्ये नाशिकला गेलो होतो निलेश आणि प्रियांकाला भेटायला. तेव्हा आम्ही अचानक सापुतारा येथे जाण्याचे ठरवले. तसे प्लान करून निलेश प्रियांका, मी आणि शिल्पा आम्ही निलेशच्या कार ने निघालो. सापुतारा काय आहे मला बिलकुल माहिती नव्हती म्हणून पूर्णपणे निलेश वरच अवलंबून होतो. जसजसे नाशिक सोडून गुजरात येऊ लागले तेव्हा समजले काहीतरी चांगले पाहायला मिळणार आहे आणि तसेच झाले. निलेश ने आम्हाला खूश केले कारण ठिकाणाच तसे होते.
नाशिकवरून सापुतार्याला यायला जवळ जवळ ३ तास लागले. भरपूर पर्यटक आले होते सापुतारा फिरण्यासाठी त्यात काही बाहेरच्या देशातून आलेले होते.
सापुतारा हे स्थळ
उन्हाळ्यात येथे २७० ते ३१० सेल्सियस येवढे तापमान राहते.हिवाळ्यात ते ९० ते २०० सेल्सियस या दरम्यान राहु शकते.
बरीच ठिकाणे पाहून आम्ही शेवटी रोपवे ने सनसेट पाहण्यास गेलो. फोटो काढून परतीच्या प्रवासास लागलो.
पाहण्यासारखी ठिकाणे
- हथगढ किल्ला
- कलाकारांचे खेडे(आर्टीस्टस् व्हिलेज)
- मध संकलन केंद्र
- गीरा धबधबा
- रोप-वे
- बोटींग क्लब
- म्युझियम (संग्रहालय)
- सनराइज पॉईंट
- सनसेट पॉईंट
- इको पॉईंट
- अॅकॅरियम
- पोहचण्याचा मार्ग
- जवळील विमानतळ- सुरत- १७२ किमी.
- जवळील रेल्वेस्टेशन- बिलीमोरा- १७२ किमी
- नाशिक या शहरापासुन सुमारे ८० कि.मी.
- मुंबई या शहरापासुन सुमारे १८५ कि.मी.
- सुरत या शहरापासुन सुमारे १७२ कि.मी.
No comments:
Post a Comment