तीळसा शिव मंदिर हे प्राचीन मंदिर वाडा शहरापासून जवळ जवळ ८ किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराचे खास वैशिष्ठ म्हणजे दर वर्षी महाशिवरात्रीला या मंदिरा बाजूला वाहणाऱ्या नदीत देवमासे दिसतात. आणि खास म्हणजे इतर दिवशी हे मासे दिसत नाहीत. असे म्हणतात कि या माश्यांपैकी एका माश्याच्या नाकात नथ आहे आणि तो मासा फक्त महाशिवरात्रीला पहाटेच दिसतो, ज्याने हा मासा पहिला तो भाग्यवान अशी तेथील भाविकांची भावना आहे. आणि मी स्वतः इतर दिवशी जाऊन मासे पहिले, तर मला एक हि मासा पाण्यात दिसला नाही. वाचकांसाठी खास महाशिवरात्रीचे फोटो, आणि माश्यांचे फोटो देत आहे.
जमल्यास या ठिकाणी नक्की भेट द्या.
तीळश्याला असे जायचे:
वाडा डेपोला उतरून बस किंवा ६ आसनी रिक्षा.
जवळ जेवण ठेवणे. खेडेगाव असल्यामुळे तेथे चांगल्याप्रतीचे जेवण मिळत नाही तसेच पिण्याचे पाणी जवळ ठेवणे.
धन्यवाद,
निशांत पोतदार
No comments:
Post a Comment